आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Discord In Family Of DSP Jiya Ul Haq On Matter Of Getting Job

डीएसपीच्‍या मृत्‍यूनंतर नवा वाद, आता नोकरीवरून सुरू झाला घरामध्‍ये कलह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवरिया- सरकारने कुंडा येथे शहीद झालेले डीएसपी झियाउल हक कुटुंबातील पाच सदस्‍यांना नोकरी देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. आणि आता यावरूनच त्‍यांच्‍या घरात नव्‍या वादास सुरूवात झाली आहे. शहीद डीएसपी यांच्‍या पत्‍नी परवीन यांनी बुधवारी आठ लोकांच्‍या नावाची सूची प्रशासनास दिली आहे. यामध्‍ये त्‍यांनी आपल्‍या माहेरच्‍या लोकांचा समावेश केला आहे. नोकरीमध्‍ये कुटुं‍बातील व्‍यक्‍तींना प्राधान्‍य दिले पाहिजे. मात्र, परवीन यांनी त्‍यांच्‍या चुलत भाऊ, बहिणीच्‍या नावाला प्राधान्‍य दिल्‍याचा आरोप दिवंगत हक यांचे भाऊ सोहराब अली यांनी केला असून त्‍यांनी त्‍यावर आक्षेपही नोंदवला आहे.

सोहराब अली म्‍हणाले, परवीन यांना प्राधान्‍य मिळायला पाहिजे. त्‍यानंतर आमच्‍या कुटुंबातील सदस्‍यांना महत्‍व दिले गेले पाहिजे. त्‍यांनी जी यादी प्रशासनाकडे दिली आहे. त्‍यात आपल्‍या माहेरच्‍या लोकांचा समावेश करण्‍यात आला आहे.

परवीन यांच्‍या यादीत त्‍यांच्‍याशिवाय दीर सोहराब अली, परवीन यांची छोटी बहीण फरहीन आझाद, नणंदेचे पती मुजीबर रहमान, बहिणीचे पती इस्‍माईल अहमद, ननंद कनीज फातिमा, रझिया खातून आणि चुलत दीर रूस्‍तम अली यांच्‍या नावाचा समावेश आहे.