आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Disturb Party Is The Main Challenge In Front Of Rajnath Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विस्कळीत पक्ष हेच राजनाथ यांच्यापुढील कठीण आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपच्या राष्‍ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून राजनाथसिंह यांना महिना होत आला. विविध राज्यांतील पक्षाच्या सद्य:स्थितीचा अंदाज यावा यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडून फीडबॅक मागवले. त्यानुसार विस्कळीत असलेली संघटनेची व्यवस्थित बांधणी करून पक्षाला निवडणुकांसाठी तयार करणे हेच त्यांच्यासमोरचे खरे आव्हान असणार आहे. या वर्षी नऊ राज्यांत होणा-या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांसाठी पक्ष मागे पडणार नाही, याची काळजी राजनाथसिंह यांना घ्यावी लागेल.


राजनाथसिंह यांना प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या अहवालात अनेक राज्यांत पक्षाची अवस्था नाजूक असल्याची कबुली दिली आहे, परंतु ही बाब अध्यक्षांना मान्य नाही. देशात पक्ष संघटना खूप मजबूत असल्याचा दावा सिंह यांनी केला असून काही उणिवा असतील तर त्या दूर केल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाला मिळालेल्या फीडबॅकनुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात या चार राज्यांत पक्षाची स्थिती तुलनेत चांगली आहे, परंतु इतर राज्यांत प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने पक्ष खूपच कमकुवत असून कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांत भाजपविरोधी पक्ष प्रबळ आहेत. या राज्यांत लोकसभेच्या 136 जागा आहेत. बिहार, राजस्थान या राज्यांत पक्षाची स्थिती चांगली असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे, परंतु तेथे पक्षांतर्गत गटबाजी व विरोध अधिक असल्याने त्यावर लक्ष देण्याची शिफारस प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आली आहे.


केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांत भाजप निवडणुकीच्या मुख्य स्पर्धेपासून बरीच दूर आहे. या राज्यांत 170 जागा असून त्यावर ताबा मिळवण्यासाठी किंवा त्यापैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी पक्षाला आपली स्थिती सुधारावी लागेल तसेच इतर प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करावी लागेल. तसे झाल्यास प्रादेशिक पक्षांना जास्त जागा सोडाव्या लागतील. त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर होऊ शकतो.

काँग्रेसच्या नाराजीचा लाभ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वेळी पक्षाने लोकसभेच्या 116 जागा जिंकल्या होत्या, तर 80 जागी विरोधी पक्षांसोबत जोरदार लढत दिली होती. त्यापैकी 60 पेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या होत्या. या वेळी देशातील मतदार अनेक कारणांमुळे काँग्रेसवर नाराज असल्यामुळे त्यापैकी अनेक जागा पक्षाचे नशीब पालटवू शकतात, पण त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करणे हीच मोठी अट आहे. या सर्व जागा श्रेणी एकमधील आहेत. जेथे पक्षाला कधीच यश मिळालेले नाही, अशा 280 जागांची निवड करून भाजपने त्या ठिकाणी विजयासाठी जोर लावण्याचे धोरण निश्चित केले आहे.