आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक वृक्ष देतो दोन जणांना जीवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दैनिक दिव्य मराठीने सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपण अभियान ‘एक झाड, एक जीवन ’ सुरू केले आहे. याचा उद्देश वृक्षारोपणाबरोबरच व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी रोपटे लावून त्याचे वृक्षात रूपांतर होईपर्यंत संवर्धन करावे, असा संदेश देणे हादेखील आहे. वृक्षारोपणासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे पावसाळा. चला, आजपासूनच आपण याची सुरुवात करूया.
सत्तरच्या दशकात झाडांच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली लोक झाडाला चिकटून उभे राहिले होते. त्या वेळी एक घोषणा गाजली होती. झाडांमध्ये आपला आत्मा वास करतो. झाड असेल तरच आपले भविष्य आहे.
परंतु आज परिस्थिती काय आहे ? आपण या आंदोलनाला विसरून गेलो आहोत. झाडांमुळे आपल्या गरजा भागवल्या जातात. त्याचेच विस्मरण आपल्याला झाले आहे. त्यामुळे जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत. या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर शंभर वर्षांत दोन तृतीयांश जंगले नामशेष होतील, असा इशाराच भारतीय वन सर्वेक्षण विभागाने दिला आहे. जंगलच का ? स्वच्छ हवा, पाऊस..सर्वकाही संपू लागेल. 2010 ते आतापर्यंत देशात 367 चौरस किलोमीटर वन क्षेत्र नष्ट झाले आहे. यामुळे देशातील एकूण क्षेत्रफळाचा विचार केल्यास जंगल व झाडांचे अस्तित्व केवळ 23.81 टक्के उरले आहे. हेच प्रमाण कधीतरी 33 ते 40 टक्क्यांमध्ये होते.
झाडांची कत्तल का होतेय?
गावांचे वेगाने शहरीकरण.
रस्त्यांचे चौपदरीकरण.
वाढते औद्योगिकीकरण.
नवीन लोकसंख्येसाठी वसाहती.
काय उपाय करता येईल ?
नवीन वसाहतीमध्ये 5 टक्के जागा हिरवळीसाठी निश्चित करणे.
रस्त्याच्या कडेला निंब-पिंपळ वृक्षांची लागवड करावी.
एक वृक्ष तोडला तर त्या बदल्यात पाच वृक्ष लावणे अनिवार्य करणे. वृक्षांच्या शिफ्टिंगला प्रोत्साहन देणे.
ही सुरुवात आपण अशी करू
जे लोक उशिरापर्यंत प्रदूषित वायूच्या संपर्कात राहतात, ते अशा वायूला फुप्फुसापर्यंत पोचवतात. त्यांना यामुळे श्वसनाचे विकार होतात. त्याचबरोबर त्याचा परिणाम मेंदूवरही होतो. यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते. हे टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी आजूबाजूला हिरवळ ठेवली गेली पाहिजे. म्हणजे प्रदूषके तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
पुढच्या पिढीला एक चांगले भविष्य मिळावे असे वाटत असेल तर जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. याची सुरुवात स्वत:पासून होते. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एक झाड लावून ते वाढवण्याचा संकल्प केला तर पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात मोठा बदल आणता येईल. दैनिक दिव्य मराठीच्या ‘एक झाड, एक जीवन’ अभियानाचा उद्देशही हाच आहे.
आपणही ‘दिव्य मराठी’च्या या उपक्रमात सहभागी होऊन शाळा, महाविद्यालय, परिसर किंवा घराजवळ रोपटे लावून हिरवळ वाढवण्यात योगदान देऊ शकता.
आपला सल्ला मोलाचा
‘दिव्य मराठी’ च्या या मोहिमेविषयी आपणही आपले मत epez@dainikbhaskargroup.comया वेबसाइटवर नोंदवू शकता.