आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - द्रमुक म्हणजे ‘सैतानी सेना’ असून काँग्रेस आणि यूपीएसोबत हातमिळवणी करून तामिळनाडूच्या प्रगतीत अडथळे आणण्याचे उद्योग करीत आहे, अशा शब्दांत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विरोधी पक्षावर तोफ डागली. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व 40 जागा जिंकून राष्ट्रीय पातळीवर निर्णायक भूमिका अदा करण्याची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात त्या बोलत होत्या. करुणानिधींच्या द्रमुकचे ‘सैतानी सेना’ अशा शब्दांत त्यांनी वर्णन केले. अण्णाद्रमुक सरकारला बदनाम करण्याचे उद्योग द्रमुक करीत असल्याची टीका जयललितांनी केली. कावेरीच्या मुद्द्यावर काँग्रेस, कर्नाटकातील भाजप सरकारवरही त्यांनी टीकेची झोड उठवली.
स्वबळावर निवडणूक
पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा बाळगून असलेल्या जयललिता यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्षाची निर्णायक भूमिका राहावी यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.