आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dna Samples Of Malkhan Bishnoi And Daughter Of Bhanwari Matched

भंवरीदेवीची एक मुलगी आणि मलखान सिंह बिश्नोईचा डीएनए एक?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूरः भंवरीदेवी प्रकरणात खळबळजनक तथ्‍य पुढे आले आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार भंवरीदेवीची एक मुलगी आणि आमदार मलखान सिंह बिश्नोईचा डीएनए एकच असल्‍याचे समोर आले आहे. सीबीआयने अद्याप यास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मलखान आणि भवंरीच्‍या एका मुलीच्‍या रक्ताची तपासणी करण्‍यात आली होती. त्‍याचा अहवाल आलेला आहे. परंतु, सीबीआयने अहवालातील माहिती उघड करण्‍यास नकार दिला. तपास अंतिम टप्‍प्‍यात असून आरोपपत्र दाखल करण्‍यात आल्‍यानंतर ही माहिती त्‍यात नमूद राहील, असे सीबीआयने म्‍हटले आहे. भंवरीदेवीच्‍या एका मुलीचा पिता मलखान सिंह बिश्नोई असल्‍याचा आरोप भंवरीच्‍या पतीने यापुर्वी केला आहे. त्‍यानंतरच सीबीआयने रक्ताचे नमुने घेतले होते.
भंवरीदेवीचे अपहरण आणि हत्‍येप्रकरणी माजी मंत्री महिपाल सिंह मदेरणा आणि मलखान सिंह बिश्नोई यांच्‍यावर आरोप आहेत. बिश्नाराम गँगने या दोघांच्‍या इशा-यावरुन तिची हत्‍या केल्‍याचा आणि पुरावे नष्‍ट करण्‍याचा आरोप आहे.
\'मी तर नावालाच नवरा होतो; मलखानच्या प्रेमात बुडाली होती भंवरी\'