आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या आवडीचे काम करा, पैसा आपोआप मिळत जाईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या रस्त्यावर ते सायकलवरून पेन विकत होते, असे काही जण सांगतात. आता त्यांच्या कंपनीची उलाढाल 1 हजार कोटी रुपये आहे, यावर आपला विश्वासही बसणार नाही. सरकारी शाळेत शिकलेल्या या तरुणाने मोठ्या हिमतीने हे साम्राज्य उभे केले आहे. इन्व्हर्टर आणि सौरऊर्जेतील आघाडीचा ब्रॅँड सुकामचे संस्थापक 50 वर्षीय कुंवर सचदेव यांची ही कथा. त्यांनी सांगितलेली यशकथा त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे :
सुकाम ब्रॅँड स्थापन करण्याचे उद्दिष्ट
मोठा भाऊ सायकलवरून पेन विकत होते. मीपण त्यांच्याबरोबर जाऊ लागलो. कॉलेज कॅँटीनमध्ये आपला स्वत:चा पेन असावा असा विचार आला आणि त्यातूनच सुकान ब्रॅँडची कल्पना सुचली. प्रिंटरमधून प्रिंट काढली तर सुकानच्या जागी सुकाम झाले. त्यानंतर तो स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले. सरकारी शाळेतून बाहेर पडल्यानंतर हिंदू कॉलेजमध्ये गणित सांख्यिकी ऑनर्समध्ये प्रवेश घेतला. मनात उद्योजक बनावे असा
विचार येत होता. 1984 मध्ये पदवीधर झालो. केबल टीव्हीची सामग्री बनवणा-या एका कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी केली व त्यानंतर ती सोडली.
एका वाक्याने आयुष्य बदलेल वाटले नव्हते
शिक्षण नोकरीच्या अनुभवातून उद्योग उभारणी करावी अशी खूणगाठ बांधली. त्या वेळी इमारतीवर डिश अ‍ॅँटेना लावून टीव्ही पाहिला जात असे. अनेक हॉटेल व मोठ्या इमारतींमध्ये केबल सेवा सुरू केली. यातून दोन-अडीच कोटी कमावले. मात्र, हे माझे लक्ष्य नव्हते. विजेच्या समस्येमुळे घरात इन्व्हर्टर लावले जायचे. इर्न्व्हटर स्थानिक
उत्पादकांचे होते. आमच्याकडेही एक इन्व्हर्टर होते. दुकानदार कधी बॅटरी घेऊन जात होता, तर कधी अन्य एखादा सुटा भाग. दुकानदाराकडे विचारणा केली तर त्यांनी तांत्रिक कारण देत पोरासोरांचे काम नाही, असे सांगितले. याच वाक्याने आयुष्य पालटून जाईल, असे कधी वाटले नव्हते.
दोन कंपन्यांसोबत अधिग्रहणाची चर्चा
इन्व्हर्टरबरोबर बॅटरी, सौरऊर्जा प्रकल्प केले आहेत. 70 देशांमध्ये 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक निर्यात केली जात आहे. अमेरिका, युरोपसह अनेक देशांतील कंपन्यांसोबत व्यावसायिक करार आहेत. दोन कंपन्यांचे अधिग्रहण करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असलेल्या जपान आणि चीनमध्ये आज आमचा ब्रॅँड विकत आहोत.
आवडीच्या क्षेत्रात काम करा
अनेक जण पैसा कमावण्यासाठी व्यवसाय करू इच्छितात. मात्र, ज्याची आवड आहे तेच काम करा. पैसा आपोआप मिळत जाईल.
उद्योजक बनण्याची नशा होती, नाव कमावण्याचे स्वप्न होते
मला दोन मुले आहेत. एक परदेशात मार्केटिंगची पदवी घेतल्यानंतर सुकाममध्ये काम करत आहे. दुसरा स्वित्झर्लंडमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. नवे कपडे घेण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागायची अशी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. हे करू, ते करू, अशी कधी योजना आखली नाही. फक्त उद्योजक बनण्याची नशा होती आणि नाव कमावण्याचे स्वप्न बाळगले होते. मुलांसाठीही माझे हेच तत्त्वज्ञान असेल. मग ते वाटेल ते करतील.
सुकामचे कर्मचारी संचालक मंडळात
त्या वेळी 50-60 लोकांच्या सहकार्यातून काम सुरू केले. आज 2500 हून अधिक कर्मचारी आमच्या ब्रॅँडला नव्या उंचीवर नेण्यासाठी परिश्रम घेत आहेत. मला व्यावसायिक कुटुंबाची पार्श्वभूमी नाही. वडील रेल्वेमध्ये होते. आवड असणा-या क्षेत्रात काम करत राहावे ही एक गोष्ट मी शिकलो. हाच मंत्र मी अंगीकारला. सुकाम असा ब्रॅँड आहे, ज्यात कंपनीत कधीकाळी काम केलेला कर्मचारी संचालक मंडळावर आहे.
... हे तर केवळ जुगाड
इन्व्हर्टरमध्ये काय विशेष असते यावर विचार केला. त्यातील सुटे भाग पाहिले तर ते केवळ जुगाड असल्याचे कळले. योग्य सामग्रीची जुळवाजुळव केल्यास फायदा होईल, असे वाटले. त्यातून सुकाम नावाने इन्व्हर्टर बनवणे सुरू केले. चांगले उत्पादन बनवण्यावर भर दिला. लोकांच्या तक्रारीवर काम केले. देशभर डीलर, डिस्ट्रिब्यूटरची यादी तयार केली.