आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरठमध्ये डॉक्टरचा निर्घृण खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - बाल रोगतज्ज्ञ असलेल्या एका डॉक्टरचा येथे अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे शनिवारी उघडकीस आले. अक्षय राजवंशी असे या डॉक्टरांचे नाव असून, त्यांच्या क्लिनिकमधील लेबर रुममध्ये त्यांचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला.

डॉक्टरांच्या गळ्याभोवती हिटरची तार आणि लाल रंगाचे कापड अडकवले असल्याचे आढळून आले. शुक्रवारी रात्री जेव्हा या ठिकाणी गोंधळ झाला त्यावेळी क्लिनिकमध्ये अनेक रुग्ण होते. क्लिनिक दुमजली असून, वरच्या मजल्यावर लेबररुम आहे. डॉक्टर संध्याकाळी आठच्या सुमारास तेथे गेले होते. तरीही कोणालाही या खुनाबद्दल माहिती मिळाली नाही. मृतदेहाजवळ दारुच्या काही बाटल्याही आढळल्या आहेत.

क्लिनिकमध्ये काम करणाऱया नर्सने सांगितले की, डॉक्टरांची पत्नी सुजाता यांचा रात्री अकरा वाजता फोन आला. त्यांनी अक्षय यांच्याकडे फोन देण्यास सांगितले. नर्स ज्यावेळी क्लिनिकच्या लेबर रुममध्ये गेली. त्यावेळी तिथे अक्षय यांचा मृतदेह नग्नावस्थेत असल्याचे तिला दिसले.
जुन्या वर्षात गाजलेल्या खून खटल्यांच्या निकालाची उत्सुकता