आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली: 'सत्यमेव जयते'च्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायातील 'गोरखधंदा' उजेडात आणल्याने अभिनेता आमिर खान विरोधात डॉक्टरांकड़ून नाराजीचा सूर निघत आहे. आमिरने डॉक्टरांना बदनाम केले असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) केला आहे. आमिरने तत्काळ डॉक्टरांची माफी मागावी, अशी मागणीही आयएमएने केली आहे. अन्यथा आमिरविरुद्ध खटला दाखल करून त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी धमकी आयएमएने दिली आहे.
वैद्यकीय व्यवसायातील वास्तव आमिरने आपल्या 'सत्यमेव जयते' या रियालिटी शोमध्ये दाखविले होते. त्यावर आयएमएने रोष व्यक्त केला आहे. आयएमएने घेतलेली भूमिका आपल्याला योग्य वाटते काय? या प्रकरणी डॉक्टरांनी माफी मागावी की, आमिरने? आता हे वाचकांनाच सांगायचे आहे.
आमिर खानबाबत आयएमएने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले. ते म्हणाले, 27 मे रोजी टीव्हीवर प्रसारित झालेल्या कार्यक्रमात काही डॉक्टरांचा अप्रामाणिकपणा उघड झाला होता. कार्यक्रमात सहभागी झालेले मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाचे प्रमुख के.के.तलवार यांनीही ते मान्य केले होते.
अभय वैद्य नामक एका पत्रकाराने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी दिशाभूल तसेच आर्थिक फसवणूक आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. पैशासाठी काही डॉक्टर रूग्णांच्या आरोग्याचे रक्षक होण्याऐवजी भक्षकच होत असल्याचे दिसत आहे. एका डॉक्टरमुळे सर्वच डॉक्टर बदनाम होत आहे. वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांचा हा अप्रामाणिकपणा पाहून एका डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसायाला 'रामराम' ठोकला होता.
एका रुग्णालयात ऑपरेशन करण्याआधीच रुग्ण दगावला होता. परंतु संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी ते त्याच्या नातेवाईकांना कळू दिले नाही. खोटे ऑपरेशन करून रूग्णाच्या नातेवाईकांकडून तत्काल सर्जरीची किंमत वसूल केली होती.
आपले मत: 'सत्यमेव जयते'च्या माध्यमातून डॉक्टरांचा 'गोरखधंदा' आमिर खानने उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही डॉक्टरांकडून आमिरला नाराजीही सहन करावी लागत आहे. आमिर खानने डॉक्टरांची माफी मागावी की, डॉक्टरांनी समाजाची माफी मागावी? तसेच तुम्हालाही डॉक्टरांनाबाबत आलेला अनुभव खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये लिहून पाठवा.
सत्यमेव जयते: आमिरने फाडला 'ऑनर किलिंग'चा बुरखा
सत्यमेव जयते : बाल शोषणाच्या तक्रारींचा पाऊस
'सत्यमेव जयते'ची लोकप्रियता आमिर खानपेक्षा जास्त
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.