आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध कंपनीच्या पैशावर दहा डॉक्टरांनी केली विदेश वारी, पंतप्रधानांकडे तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मध्य प्रदेशातील 10 डॉक्टरांनी औषध कंपन्यांच्या पैशावर इंग्लंड- स्कॉटलंडची वारी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराबद्दल खासदार ज्योती मिर्धा यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर सरकारने याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशातील 10 डॉक्टरांनी औषध कंपन्यांच्या पैशावर, कुटुंबासह विदेशवारी केली. याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार डॉ. ज्योती मिर्धा यांनी पंतप्रधानांना भेटू तक्रार केली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत चौकशीचे आदेश दिल्यावर इंदूरच्या ड्रग कंटोल विभागाने (डीसीओ) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अर्थात आता या डॉक्टरांनी आपण कंपनीच्या खर्चाने नव्हे, तर स्वत:च्या खर्चाने विदेश वारी केल्याचा दावा केला आहे. खासदार डॉ. मिर्धा या आरोग्य मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्य आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 डॉक्टरांनी मेमध्ये इंग्लंड व स्कॉटलंड सहकुटूंव (एकूण 30 लोक) विदेश यात्रा केली. त्यांचा खर्च इंदूर येथील औषध कंपनी इंटास फार्मास्युटिकल कंपनीने केला आहे.
हे आहेत डॉक्टर : डॉ. वृषाली नाडकर्णी कन्सल्टंट, गीता भवन रुग्णालय, डॉ. राजेश मुळे कन्सल्टंट सुयश रुग्णालय, डॉ. अतुल तापडिया, न्यूरोलॉजिस्ट, बॉम्बे हॉस्पिटल, डॉ. धनराज पंजवानी, चोइथराम हॉस्पिटल, डॉ. श्रीकांत रेगे (सर्व इंदूर) डॉ. महेंद्र चौहान, उज्जैन डॉ. नरोत्तम वैश्य, डॉ. अतुल सहाय (ग्वाल्हेर) , डॉ. हर्ष सक्सेना न्यूरोलॉजिस्ट, डॉ. अलोक अग्रवाल (जबलपूर)
काय होऊ शकते कारवाई ?
-मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया व मध्य प्रदेश मेडिकल कौन्सिल संबंधित डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करू शकते. हे डॉक्टर सरकारी सेवेत असतील तर त्यांना बरखास्तही केले जाऊ शकते. याशिवाय भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गतही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.- डॉ. के. के. ठस्सू, संचालक, आरोग्य सेवा
कोड ऑफ एथिक्स
- कोणताही डॉक्टर कंपनीकडून भेटवस्तू घेणार नाही
- कुठल्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही
- प्रवासासाठी ग्रँट घेणार नाही.
- कुठल्याही औषध कंपनीची जाहिरात करणार नाही. (10 डिसेंबर 2009 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार)