आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Speak On Priminister Candidate : Rajnath Singh

पंतप्रधान उमेदवारीबद्दल जाहीर वक्तव्ये करू नका : राजनाथ सिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याबाबत कोणत्याही भाजप नेत्याने जाहीर वक्तव्य करू नये, असा सल्ला पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी दिला आहे. मात्र, हा सल्ला न जुमानता सी. पी. ठाकूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा या मुद्द्यावर जाहीर भाष्य केलेच.

‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संसदीय मंडळाने घेण्याची भाजपची परंपरा आहे. यात कोणालाही शंका असण्याचे कारण नाही,’ असे सिंह म्हणाले. नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावे, अशी मागणी सर्वप्रथम राम जेठमलानी आणि यशवंत सिन्हा यांनी केली होती. मोदींच्या नावावरून एनडीएमधील मतभेदही जाहीररीत्या समोर आले.

असा वेडेपणा पाहिला नाही : शरद यादव
पंतप्रधानपदावर जाहीर वक्तव्ये करण्याची एनडीए नेत्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा थांबली पाहिजे, असा सल्ला जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी दिला आहे. सहा दशकांत असा वेडेपणा आपण पाहिला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.