आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉवर गॅलरी : बाहेरून पाठिंबा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाहेरून पाठिंबा
सरकारांना बाहेरून पाठिंबा देणे ही आजकालची फॅशन झालेली आहे. पण विरोधी पक्षाला बाहेरून पाठिंबा दिल्याचे तुम्ही यापूर्वी ऐकले आहे का? या आजाराची सगळी लक्षणे सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या विवशतेमागे असलेल्या मूळ आजाराच्या अगदी उलट असतात. ही सगळी उलटी लक्षणे सुब्रह्मण्यम स्वामींमध्ये एकत्रितरीत्या दिसून येतात. राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा झेंडा स्वामींनीच उचलून धरला, नाहीतर एनडीए म्हणजे ‘नथिंग डूइंग अलायन्स’ बनण्याच्या वाटेवर होता. स्वामींनीच प्रथम अब्दुल कलामांशी व त्यांचा नकार आल्यावर पी. ए. संगमांशी चर्चा केली. स्वामी जनसंघाचे जुने कार्यकर्ते आहेत, पण त्यांचे सूर वाजपेयींशी जुळले नाहीत. आता अडवाणी व संघ मात्र त्यांचे समर्थन करत आहेत. तसे पाहता या निवडणुकीत स्वामींकडे एकही मत नाही, पण खरे राजकारण मतांवर चालत नाही हे स्वामींना चांगलेच ठाऊक आहे.

‘सर’चक्र
जर तुम्हाला असे दोघे भेटले ज्यांच्यापैकी एक पाठिंबा देत असेल व दुसरा पाठिंबा घेत असेल, तर देणारा व घेणारा कोण हे कसे ओळखणार? समर्थन शास्त्राच्या पुस्तकानुसार अशा दोघांपैकी कोण कोणास ‘सर’ म्हणतो व कोण कोणाच्या घरी जातो, यावरून दोघांची नेमकी ओळख पटते. दोघांपैकी खरा ‘बॉस’ कोण हेसुद्धा यावरून स्पष्ट होते. पुस्तकात असेही म्हटले आहे की परिस्थिती पूर्णत: अनिश्चित असते व कधी कधी तर रात्रभरातून बदलूही शकते. उदाहरणार्थ प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहनसिंग रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते व मुखर्जींना ते ‘सर’ म्हणत. कालांतराने मनमोहनसिंग पंतप्रधान झाले, तेव्हा प्रणवदा त्यांना ‘सर’ म्हणू लागले, मनमोहनसिंंगही त्यांना त्यावेळीही ‘सर’ असेच म्हणत. आता प्रणवदा राष्ट्रपती झाल्यावर कायमस्वरूपी ‘सर’ होतील. त्यानंतर प्रणवदांचे 7 रेसकोर्स रोड व 10 जनपथवर धावतपळत जाणेही कायमचे बंद होईल. ज्याला काम असेल, तोच त्यानंतर रायसीनाकडे धावत पळत जाताना दिसेल.