आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drunk Driver Must Not Be Let Off Lightly, Says Sc ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मद्यपी चालकांना कठोर शिक्षा व्हावी- सर्वोच्च न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मद्यप्राशन करून गाडी चालवण्याचे प्रकार समाजासाठी अत्यंत धोकादायक असून अशा घटनांतील दोषींना साधारण शिक्षा व दंड ठोठावून सोडून देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नवी दिल्लीच्या बहुचर्चित बीएमडब्ल्यू रस्ते अपघातातील दोषी संजीव नंदाची शिक्षा वाढवण्यास
नकार व त्याला सरकार दरबारी 50 लाख रुपये नुकसानभरपाईपोटी जमा करण्याचे आदेश देण्याबाबत न्यायमूर्ती दीपक वर्मा व न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांनी दिलेल्या निर्णयात पादचा-यांच्या स्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मोठ्या शहरांमध्ये पादचारी सुरक्षित नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत चालणा-या मेजवान्या व मद्याच्या नशेत गाड्या चालवणे शहरांतील उच्चभ्रू वर्र्गाच्या जीवनशैलीचा एक भाग बनत आहे. न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे की, ‘मद्य पिऊन गाडी चालवणे समाजासाठी मोठा धोका आहे. मद्याच्या नशेत गाडी चालवल्यामुळे दररोज दुर्घटना होतात व जीवित हानी होते.