आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Due To Centure Of Indian Cinema Special Post Ticket Will Publish

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय सिनेमाच्या शताब्दीनिमित्त विशेष टपाल तिकीट निघणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय सिनेमाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पोस्ट खात्यातर्फे एका विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.माहिती व प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात टपाल खात्याला तशी शिफारस केली होती. भारतीय सिनेमाच्या आजवरच्या वाटचालीतील ठळक टप्पे दर्शवणारे हे तिकीट असेल.

माहिती व प्रसारण मंत्रालयाची शिफारस टपाल खात्याने स्वीकारली असून त्यानुसार हे तिकीट जारी केले जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 3 मे रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या समारंभात टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे. यापुढे राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण दरवर्षी 3 मे रोजीच करण्याचा निर्णय दादासाहेब फळके यांनी तयार केलेला पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट 3 मे रोजीच प्रदर्शित झाला होता. त्यानुसार यावर्षी 3 मे रोजी भारतीय सिनेमाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.यानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे कार्यक्रम सुरू होणार असून राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यापर्यंत ते चालणार आहेत. राजधानी दिल्लीत सिरी फोर्ट सभागृहात हे कार्यक्रम होतील.
राष्ट्रीय फिल्म आर्काइव्हद्वारे संरक्षित करण्यात आलेल्या मूक चित्रपटांचे प्रदर्शन, दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित नाटकाचे प्रदर्शन, सत्यजित रे सोसायटीवर विशेष कार्यक्रम, दुर्मिळ चित्रपट पोस्टर्सचे प्रदर्शन आदी कार्यक्रम यानिमित्त होणार आहेत.

नव्या योजना सुरू होणार
भारतीय सिनेमाच्या शंभरीनिमित्त चित्रपट आयोग या वर्षीपासून काही नव्या योजना सुरू करणार आहे. देशी-विदेशी चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी देण्यासाठी सिंगल विंडो प्रणाली लागू करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय तसेच राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन या महत्त्वाकांक्षी योजनांचाही यात समावेश आहे.