आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताणामुळे पंचविशीतच गाठतोय मधुमेह !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - तरूणांमध्ये अति ताण घेण्याची सवय रूजू लागली आहे. परिणामी तरूणांमध्ये मधुमेहासारखा आजार वाढताना दिसू लागला आहे, असा दावा केरळमधील आयुर्वेद रिसर्च सेंटरने केला आहे.

डॉक्टर सेबस्टीयन निजारालाकट्टू यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे संशोधन केले आहे. आजच्या तरूण पिढीला पंचविसाव्या वर्षीच मधुमेहाने गाठल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डॉक्टर सेबस्टीयन यांना वैद्यकीय क्षेत्रातील वीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी या काळात तरूणांचे सुक्ष्म अवलोकन केले. त्यातून अनेक गोष्टी त्यांना अभ्यासता आल्या. अन्नाचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते. ते लिव्हरमध्ये साठवले जाते. परंतु व्यायाम नसल्यामुळे लिव्हरमधील ग्लुकोजचा वापर होत नाही. तरूणांचा कल पॅकिंगचे पदार्थ खाण्याकडे अधिक आहे. पॅकिंग केलेले पदार्थ हे प्रिझर्व्हेटिव्ह स्वरूपाचे असतात. परंतु तो पदार्थ खाल्ल्यानंतर पोटातील फायदेशीर जीवाणूंनाही मारतो. त्याचा परिणाम चयापचयावर होतो. असे ते म्हणाले .

काय इतर कारणे ?
कामाची नवी शैली, अनिद्रा यातून तणाव वाढू लागला आहे. त्याशिवाय व्यायामाचा अभाव देखील एक महत्वाचे कारण आहे.
कशावर परिणाम ?
नवीन जीवनशैलीमुळे तरूणांच्या मेंदू तसेच शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
काय टाळावे ?
घरी तयार केलेल्या अन्नाला कटाक्षाने प्राधान्य दिले गेले पाहिजे. जतन केलेले किंवा पॅकींगमधील अन्न पदार्थ खाणे टाळावे. मांसाहाराचा उपयोगही मर्यादित करावा. आठवड्यातून एकदा मांसाहार करण्यास हरकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला.