आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउज्जैन - बाजारात गेल्यावर ब्रँडेड वस्तू विकत घेताना यापुढे खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. कारण मार्केटमध्ये प्रत्येक तिस-या ब्रँडची ‘डुप्लिकेट’ उत्पादने विक्रीसाठी आली आहेत. आश्चर्य म्हणजे मूळ ब्रँडचा रंग, डिझाइन, पॅकिंग, लोगो आणि सीरियल नंबरची अशाप्रकारे बेमालूम नक्कल करण्यात आली आहे की, सुशिक्षित आणि जागरूक ग्राहकांनाही असली आणि नकलीमधला फरक कळत नाही. प्रशासन, ग्राहक संरक्षण परिषद, ग्राहक पंचायत किंवा इतर कोणत्याही संघटनेने या बाबीची गंभीर दखल घेऊन कारवाई केलेली दिसून येत नाही. त्यामुळे ब्रँडेड चप्पल, बूट, कपडे, मोबाइल, चश्मे यासह कॉस्मेटिक आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील प्रत्येक उत्पादनाचे ‘डुप्लिकेट’ बाजारात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, ज्या ग्राहकांनी ग्राहक मंचात न्यायासाठी धाव घेतली, त्यापैकी शेकडो प्रकरणे कित्येक वर्षांपासून धूळ खात पडली आहेत. याची कारणे काहीही असली तरी थेट नुकसान ग्राहकांचेच होते, याकडेही दुर्लक्ष करता येत नाही.
असली-नकलीतील फरक ओळखा
मोबाइल
डुप्लिकेट कसा? सोनी एरिक्सन हा सनी एरिक्सन नावाने, नोकिया मोबाइल नोक्सियाच्या नावाने, सॅमसंग मोबाइल सेनसंग नावाने बाजारात उपलब्ध आहेत. यासह इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने ब्रँड नावांशी मिळतेजुळते नाव धारण करून लोकांना फसवत आहेत.
ख-याची ओळख अशी - बार कोडद्वारे ओरिजनल वस्तूंची ओळख पटते. बॅटरीसुद्धा मोबाइल कंपनीचीच असते. मोबाइलमध्ये बॅटरी असते त्याठिकाणी बारकोडसहित मॉडेल नंबर, एसएसएन नंबर व निर्माता, उत्पादकाचे नाव लिहिले असते. ब्रँडचे नाव, स्पेलिंग व लोगो ठरलेला असतो.
इंजिन ऑइल
डुप्लिकेट कसे? ब्रँडेड कंपनीच्या जुन्या डब्यांमध्ये स्वस्त इंजिन ऑइल भरून बाजारात उपलब्ध आहे. काही विक्रेते नवे डबे तयार करून त्यावर ब्रँडेड कंपनीचे सेम टू सेम स्टीकर लावून त्याची सर्रास विक्री करतात.
ख-याची ओळख अशी- ब्रँडेड कंपनीच्या डब्यावर बारकोड असतो. डब्याचे झाकण अशा पद्धतीने सील केले असेल की, त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकणार नाही. असली आणि नकली ऑइल ओळखणे कठीण असले तरी 50 रुपयांच्या एका टेस्ट पेपरद्वारे त्याची परीक्षा करता येऊ शकते.
बूट
डुप्लिकेट कसे? वुडलँड, अॅक्शन, नाइक, अॅडिडास, रेड चीफसहित अनेक ब्रँडचे 90 टक्के सेम टू सेम दिसणारे डुप्लिकेट बूट बाजारात उपलब्ध आहेत. कलर, डिझाइन, कंपनी लोगोसहित सर्व गोष्टी इतक्या मिळत्याजुळत्या असतात की ग्राहकांची अगदी सहज फसवणूक होऊ शकते. मात्र अशा बूटच्या बॉक्सवर बारकोड नसतो.
ख-याची ओळख अशी- वुडलँडची ओळख त्यांच्या 18 पानांच्या झाडाच्या लोगोने पटते. हा लोगो इनर आणि आउटर सोलसह बुटांच्या बाजूच्या भागातही लावलेला असतो. ब्रँडेड कंपनीच्या बॉक्सवरील बारकोड कंप्युटरवर सहज वाचता येतो.
सनग्लासेस
डुप्लिकेट कसे? रेबन, करेरा, ट्यूमा, टॉमी हिलफिगर, स्पायकर, ली कूपर सनग्लासेस हे असे ब्रँड आहेत ज्यांच्या वस्तूंची रेंज 2500 रुपयांपासून सुरू होते. तरीही अशा ब्रँडचे डुप्लिकेट 100 ते 700 रुपयांपर्यंत विकले जातात.
ख-याची ओळख अशी- रेबनची पडताळणी करायची झाल्यास, नाकावर लावण्यात आलेल्या फ्रेमच्या खालच्या भागात रेबन नंबर आणि मॉडल नंबर लिहिलेला असतो. डाव्या दांडीवर अरबी मॉडेल आणि कलर कोडिंग, उजव्या दांडीवर ‘रेबन मेड इन इटली’ असे लिहिलेले असते. ओरिजनल रेबन चश्म्यांच्या किमती 6390 रुपयांपासून सुरू होतात.
तज्ज्ञांचे मत- दिलीप वैद्य, वकील, ग्राहक मंच
ब्रँडेड मालाच्या डुप्लिकेट वस्तूंची विक्री करणे हा फसवणुकीचा गुन्हा ठरू शकतो. असे केल्यास 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीआधीच ओरिजनल वस्तू ओळखाव्यात आणि पडताळणी करूनच त्यांची खरेदी करावी. सामान विकत घेतल्यानंतर पक्के बिल घ्यावे, वॉरंटी आणि टीन नंबर लिहिलेला असेल, असेच सामान खरेदी करावे. आपण खरेदी केलेल्या सामानात कोणत्याही प्रकारची शंका आल्यास ग्राहक मंच, ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांकडे लेखी तक्रार करा. प्रत्येक ब्रँडेड सामानावर बारकोड असतोच, हे लक्षात ठेवा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.