आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीवायएसपीला संतप्त जमावाने जिवे मारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- उत्तर प्रदेशातील कुंडाच्या वलीपूर गावात सरपंचाची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलिस उपअधीक्षकाला जिवे मारले. पोलिस व ग्रामस्थांच्या धुमश्चक्रीत सरपंचाचा भाऊदेखील मारला गेला.
सरपंच नन्हे यादवच्या हत्येनंतर ग्रामस्थांनी ठाण्याला घेराव घालत पोलिसांवर गोळीबार केला. दीड तास चाललेल्या चकमकीत टुंडा येथील उपअधीक्षक झिया उल हक आणि सुरेश यादव यांचा मृत्यू झाला. 6 पोलिस व 35 ग्रामस्थ जखमी झाले. दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या 500 फैरी झाडल्या गेल्या. गावात तणाव असून, अलाहाबादहून पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे. जमाव नियंत्रणात आल्याचे प्रतापगढचे एसपी अनिल राय यांनी सांगितले. मुख्यमंत्री अखिलेश यादव सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजाभय्या यांचा कुंडा हा मतदारसंघ आहे. प्रकरणात त्यांच्या चालकाच्या नातलगाचे नाव आहे.