आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणातील कमतरतांबाबत सर्वेक्षण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलन (हिप्र) - मूलभूत शिक्षणात काय सुधारणा करणे आवश्यक आहे याची माहिती मिळवण्यासाठी देशात नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे केला जाणार आहे. हा सर्व्हे करण्याची जबाबदारी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेवर (एनसीईआरटी) सोपवण्यात आली असून, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्यांना या सर्व्हेचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशातील आठ जिल्ह्यांमध्ये फेबु्रवारी महिन्यात केला जाणार आहे. या सर्व्हेतून मूलभूत शिक्षणातील कमतरतांची माहिती मिळवल्यानंतर सरकार त्याबाबत योजना तयार करणार आहे. देशातील शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढावी म्हणून जे धोरण राबवले जात आहे त्याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना मिळतो की नाही याचीही माहिती या सर्वेक्षणातून समोर येईल.
सर्वेक्षणाचा उद्देश
देशातील मूलभूत शिक्षणव्यवस्था मजबूत व्हावी हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. हे सर्वेक्षण आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे केले जाणार आहे. या सर्व्हेत विद्यार्थ्यांना चार विषयांचे प्रश्न विचारले जातील. यात हिंदी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे प्रश्न असतील. सध्या मिळत असलेल्या शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना काय वाटते हे यातून समोर येईल. मार्चमध्ये आठवीच्या परीक्षा झाल्यानंतर मुले काय शिकली हे पाहण्यासाठी नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे होणार आहे. वर्षभर शिकल्यानंतर मुलांनी काय अचिव्ह केले हेही यातून माहीत होणार आहे.
ओएमआर शीटवरील पहिला सर्व्हे
नॅशनल अचीव्हमेंट सर्व्हे देशात पहिल्यांदाच ओएमआर (आॅप्टिकल मार्क रेकग्निशन) शीटवर होणार आहे. त्यामुळे सर्व्हेचे काम लवकर
संपेल. ओएमआर शीट स्कॅन करून संगणकात सेव्ह केले जाईल. यापूर्वीचे सर्व्हे रिपोर्ट संगणकात फीड करावे लागत असत. त्यात त्रुटी राहून जाण्याची शक्यता जास्त असे. ही शक्यता आता राहिलेली नाही.

15 शाळांचा सर्व्हे
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेसाठी डाएटकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यातील 15 शाळा निवडण्यात आल्या आहेत. या सर्व्हेत शाळा व घरांमधील
शैक्षणिक वातावरण आणि मूलभूत सुविधांचाही उल्लेख असेल.