आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission, Letter Reserve Bank Of India

निवडणुकीतील ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांवर करडी नजर ठेवा; रिझर्व्ह बँकेला पत्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: देशातील आगामी पाच राज्यांत होणा-या विधानसभा निवडणुकीत बँकांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. मतदारांना लाच
देण्याचे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सर्व व्यवहारांकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, अशी विनंती निवडणूक आयोगाने केली आहे.
निवडणूक काळातील गैरप्रकारांविषयी आयोगाने रिझर्व्ह बँकेकडे एका पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच आयकर खात्याने दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझियाबाद येथे एक छापा टाकून त्यात 12.38 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रिझर्व्ह बँकेला ही सूचना केली आहे. दुसरी अशीच एक घटना घडली. एचडीएफसी बँकेतील 60 लाख रुपये आयकर विभागाने जप्त केले आहेत. अगोदरचे प्रकरण हे आयसीआयसीआय बँकेशी संबंधित होते. या घटना निवडणूक काळातील गैरव्यवहारांचा प्रकार आहे का, हे अद्याप निश्चितपणे स्पष्ट झाले नाही. परंतु याचा शोध घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचीही मदत घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गाझियाबाद येथील घटनेची चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर बँक व्यवहारांचा गैरवापर होत नाही ना यावरदेखील बारकाईने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा व उत्तराखंड येथे विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे.