आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कंपनीच्या कारकुनाकडे 30 कोटींहून अधिक संपत्ती सापडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - महिन्याकाठी 40 हजार रुपये वेतन घेणा-या वीज कंपनीच्या एका कारकुनाकडे 30 कोटींहून अधिक संपत्तीचे घबाड सापडले आहे. लोकायुक्त पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही संपत्ती उघडकीस आली. अर्जुनदास लालवानी (57) असे कारकुनाचे नाव आहे. एकेकाळी मातीच्या घरात राहणा-या या सरकारी बाबूकडे आज बैरागडमध्ये तीन घरे, 12 दुकाने आणि एक भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. शिवाय 60 लाख रुपयांच्या एफडी व राष्‍ट्रीय बचत योजनेतील गुंतवणूक आहे. त्याच्याकडे भौरी येथे सव्वा एकर जमीन, 51 हजार रुपये रोख, 28 बँक खाती आणि 5 लाखांचे दागिनेही आहेत. गोविंदपुरामध्ये वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयात गेल्या दहा वर्षांपासून ठाण मांडून बसलेला लालवानी ‘असिस्टंट ग्रेड-2’ पदावर कार्यरत आहे. मंगळवारी पोलिस उपाधीक्षक राजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील लोकायुक्त पोलिस पथकाने त्याच्या बैरागड येथील घरावर पहाटे पाच वाजता छापा टाकला. 9 तास ही कारवाई सुरू होती.

कोठे, काय सापडले?
* मालवीय नगर, बैरागड, एमपी नगर आणि चौक बाजारात 12 दुकाने
* बैरागडमध्ये 3 घरे, भौरीत सव्वा एकर जमीन
* बैरागड, एमपीनगरमध्ये प्रत्येकी एक गॅरेज
* बैरागडमध्ये एक भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स
* 60 लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आणि विकास पत्रात गुंतवणूक
* एक कार, दोन दुचाकी
* 51 हजार रुपये रोख

मातीच्या घरातून रुपेरी महालात
काही वर्षांपूर्वी लालवानीची आर्थिक स्थिती अगदी बेताची होती. मातीच्या घरात तो राहत होता, असे शेजारी सांगतात.सूत्रांनुसार तो काही काळ रियल इस्टेट व्यवहारात होता.