आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electronic Product Now Sale Only Granted, New Policy

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दर्जाचे नवे नियम; गॅरंटी असलेल्या वस्तूचीच विक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एखाद्या वस्तूची उत्पादकाने गॅरंटी दिली नाही आणि ती खराब झाली तर आम्ही जबाबदार नाही, असे म्हणून दुकानदार आता हात वर करू शकणार नाहीत. त्यांना गॅरंटी द्यावीच लागेल; अन्यथा अशा वस्तूंचे उत्पादनही करता येणार नाही आणि त्या विकताही येणार नाहीत. तसे केल्यास शिक्षा होईल. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने यासाठी कायदा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम बाजारपेठेत 40 ते 50 टक्के वाटा असलेल्या चिनी वस्तूंवर होणार आहे.
सध्या बाजारात इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या दर्जाची खातरजमा करण्याची जबाबदारी ग्राहकावरच आहे. कोणत्या वस्तूची किती
गॅरंटी आहे किंवा नाही याची माहिती देऊन दुकानदार स्वत: नामानिराळा राहतो. स्टँडर्डायझेशन टेस्टिंग क्वालिटी सर्टिफिकेट युनिटचे महासंचालक एन. ई. प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारात असलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या दर्जाबाबत
काहीही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून गुणवत्तेचे नियम लागू करून तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा विचार केला जात आहे. जर एखाद्या वस्तूच्या उत्पादनात दर्जाकडे लक्ष दिले जात नाही, असे वाटले तर त्या उत्पादनाची तपासणी करणे अनिवार्य असेल.
पुढे काय : या धोरणामुळे फक्त देशासह विदेशातून येणाºया वस्तूंवरही परिणाम होणार आहे. यास अंतिम मंजुरी देण्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या विषयावर अर्थ व परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे इतर देशांशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांवर होणाºया परिणामांचा अंदाज यातून येईल. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव जे. सत्यनारायणा म्हणाले की, हे धोरण कोणताही देश किंवा एखाद्या कंपनीच्या उत्पादनाबाबत आखण्यात आलेले नाही, तर ग्राहकांना त्यांच्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळवून देणे हा यामागील उद्देश आहे.
सर्वात आधी या 17 उत्पादनांना लागू होईल.
टीव्ही, टेलिफोन, कॉम्प्युटर सीपीयू, प्रिंटर, स्कॅनर, मॉनिटर, की-बोर्ड, सेट टॉप बॉक्स, रेडिओ, म्युझिक सिस्टिम, मायक्रोवेव्ह ओव्हन, आन्सरिंग मशीन, रिसेप्शन आॅडिओ सिस्टिम, आॅटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक घड्याळे, गेम्स, डीव्हीडी प्लेयर. (सरकार यादी वाढवू शकते.)
नव्या नियमांमुळे असे होतील बदल
सध्या असे घडते
० आयएसआय चिन्हांकित उत्पादने खरेदी करा, असे ग्राहकालाच सांगितले जाते.
० आयएसआय चिन्हाविना उत्पादने विकणे गुन्हा नाही.
० आयएसआय चिन्ह घेऊन जर कुणी दर्जा टिकवला नाही तर त्याचा परवानाच रद्द होतो.
० वस्तूचा दर्जा वाईट असल्यास न्यायालयात तो सिद्ध करण्याची जबाबदारी ग्राहकाचीच होती.
आता असे होईल
० वस्तूचा दर्जा टिकवणे आता उत्पादकांची जबाबदारी असेल.
० दर्जाहीन वस्तूंचे उत्पादन आणि विक्री केल्यास शिक्षा होईल. (शिक्षेचे स्वरूप अजून ठरले नाही.)
० सर्वच उत्पादकांवर एकसमान नियम लागू.
० वस्तू नादुरुस्त निघाल्यास उत्पादक व विक्रेत्याला न्यायालयात हजर व्हावे लागेल.
चीनमधून येणाºया खेळण्यांमध्ये जस्ताचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. ते मुलांसाठी धोकादायक आहे. सरकारचे नवे नियम देशी-विदेशी सर्वच उत्पादकांवर सक्तीने लागू आहेत. आयएमईआय नंबर नसलेल्या चिनी आणि भारतीय मोबाइलवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली. या नियमाला सुरुवातीला विरोध झाला. आता फक्त आयएमईआय नंबर असलेले फोनच विकले जातात.
ग्राहकांनो, कुठलीही वस्तू पारखूनच घ्या!