आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अजमेर- अभियांत्रिकी शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी संस्कृती आणि उपनिषदांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी घरदार सोडून आर्य समाज संस्थेत दाखल झाला आहे.
मुलगा ब्रह्मचर्य जीवन जगणार असल्याची शक्यता पाहता आई भरतपूरहून अजमेरला पाहोचली. तिने मुलाचे मन वळवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्याने वेद-उपनिषदांचा अभ्यास सोडणार नसल्याचे सांगितले. मुलाला या मार्गावरून मागे घेण्यासाठी आईने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही प्रयत्न केले, परंतु त्यांना त्यात यश आले नाही. अभ्यासानंतर घरी परतण्याचे आश्वासन दिल्यानंतर आई घरी परतली. बयाना येथील 23 वर्षीय रविशंकर गुप्ताने बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी पदवी प्राप्त केल्यानंतर वैदिक, संस्कृत आणि उपनिषदांच्या अभ्यासासाठी ऋषी उद्यान येथील गुरुकूल आर्य समाज संस्थेमध्ये प्रवेश केला. वेद-उपनिषद आणि संस्कृत व्याकरणातील रहस्य जाणून घेण्याची रविशंकरची इच्छा आहे. गुरुकुलामध्ये आपल्या मुलाला जबरदस्तीने ब्रह्मचारी बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार मोहनलाल गुप्ता व त्यांच्या पत्नीने पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर मुलगा स्वखुशीने गुरुकुलात दाखल झाल्याचे उघड झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.