आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपियन युनियनने मोदींवरील बहिष्कार मागे घेतला; मोदींचेही आश्वासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- युरोपियन युनियन (ईयू) देशांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर 10 वर्षापासून घातलेला बहिष्कार मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मोदी यांनी ईयूच्या देशांना गुजरातमध्ये 2002 सारखे दंगली पुन्हा कधीही होणार नाहीत, याचे आश्वासन दिले आहे. 'ईयू'ने हा बहिष्कार मागे घेतल्याचे अधिकृत जाहीर केले नसले तरी यासाठीची 'लंच डिप्लोमसी' पार पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एक महिने पहिले जर्मनीचे राजदूत मायकल स्टेनर चाणक्यपुरी निवासस्थानी एका पांढ-या रंगाच्या अबेसेडरमध्ये पोहचले होते. तसेच याच कारमध्ये होते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जे त्याआधी 15 दिवस आधी यांनी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले होते.

मोदी यांनी दोन तास स्टेनर व इतर पाहुण्यांसोबत घालवले. यात पाहुण्यांत होते युरोपियन युनियनमधील सर्व देशांचे राजदूत. लंच टाईम्समध्ये या राजदूत पाहुण्यांनी मोदींना गुजरातमध्ये झालेल्या 2002 च्या दंगलीवरील प्रश्नांचा भडीमार केला. मोदी यांनी त्यांच्या प्रश्नांची सहज उत्तरे दिली. मोदींनी या राजदूतांना आपल्या प्रशासनाचे मॉडेल आणि भारताविषयीचे दृष्टिकोण याबाबत सारे काही सांगितले होते.

गुजरात दंगलीनंतर ठीक 11 वर्षांनी अशी पहिलीच बैठक झाली. ज्यात युरोपियन देशांच्या प्रतिनिधींनी मोदींची भेट घेतली. याआधी सुमारे तीन महिन्यापूर्वी गांधीनगरमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त सर जेम्स बेवन यांनी मोदींची भेट घेतली होती. या भेटी म्हणजे म्हणजे मोदींवर यूरोपियन युनियनने घातलेला बहिष्कार मागे घेण्याचे संकेत होते.

एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, मोदींसोबत झालेली ती अनौपचारिक भेट होती. आम्ही (युरोपियन देश) मोदींसोबत चांगले संबंध बनवू इच्छितो. ब्रिटिश व डॅनिश राजदूताप्रमाणे यूरोपीय युनियनचे राजदूत मोदींना अहमदाबादमध्ये जावून भेटले नाहीत. मोदींनी आम्हाला भेटावे अशी इच्छा होती.

आणखी एका देशाच्या राजदूताच्या म्हणण्यानुसार, आम्ही तीन कारणांनी मोदींना 'लंच'ला बोलावण्याचा निर्णय घेतला कारण ते सलग तिस-यांदा निवडणूक जिंकले होते. ते दिग्ग्ज राजकारणी आहेत. त्यांनी आपले महत्त्वकांक्षा जाहीर केली ती दढवली नाही. आता ते राष्ट्रीय राजकारणात येऊ इच्छित आहेत. आम्ही त्यांच्याकडे आणखी दुर्लक्ष करु शकत नाही.