आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exclusive interview of president pratibha devi singh patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE: निवृत्तीनंतर या गोष्‍टींना राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील देणार प्राधान्‍य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाच्‍या पहिल्‍या महिला राष्‍ट्रपती बनण्‍याचा मान मिळवलेल्‍या प्रतिभा देवीसिंह पाटील यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्‍या 25 जुलैला संपणार आहे. या कार्यकाळात त्‍यांनी राष्‍ट्रपती पदाला साजेशे काम केले. सामान्‍य लोकांसाठी राष्‍ट्रपती भवनाचे दरवाजे त्‍यांनी कायम उघडे ठेवले. दैनिक भास्‍कर (दिल्‍ली)चे संपादक राजेश उपाध्‍याय यांनी या प्रवासाबद्दल जाणून घेण्‍यासाठी त्‍यांच्‍याशी चर्चा केली.
प्रश्‍न- पाच वर्ष रायसीना हिल्‍सच्‍या अनुभवाकडे आपण कसे पाहता?
उत्तर- या कालावधीत खूप काही शिकण्‍याची संधी मिळाली. माझा आधीपासूनच लोकांशी थेट संवाद आणि संपर्क साधण्‍यावर विश्‍वास राहिला आहे. त्‍यामुळे इथेही हाच क्रम सुरू राहिला. या पाच वर्षांत राष्‍ट्रपती भवनमध्‍ये दीड लाख लोकांना भेटले. मी ज्‍या राज्‍यांत किंवा केंद्रशासीत प्रदेशात गेले. तेथे समाजातील सामान्‍य लोकांशी बोलण्‍याचा प्रयत्‍न केला. दुर्घटनाग्रस्‍त मुलांना भेटले. विशेष करून सीमावर्ती भागात मी गेले. समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहापासून दूर असलेल्‍या लोकांना दिल्‍लीला बोलावले. यामध्‍ये 90 टक्‍के लोकांनी तर आपल्‍या आयुष्‍यात पहिल्‍यांदाच रेल्‍वे पाहिली होती.
प्रश्‍न-तुम्‍ही महिलांना सशक्‍त करण्‍यासाठी राष्‍ट्रपती भवनाचा कसा उपयोग केला?
उत्तर- महिला सशक्‍त झाल्‍या तरच देश सशक्‍त होईल. महिलांच्‍या सबलीकरणासाठी मी कायम काम करत आले आहे. मी अर्थशास्‍त्रात एम.ए केलेले आहे. त्‍यामुळे आर्थिक सुधारणेवर माझा भर असतो. माझ्या सांगण्‍यावरूनच 2008मध्‍ये राज्‍यपालांच्‍या बैठकीत त्‍यांच्‍या तीव्र सामाजिक-आर्थिक विकास आणि सशक्‍तीकरणासाठी राज्‍यपालांची समिती बनवली आहे. या समितीच्‍या शिफारशी सरकारने गंभीरतेने घेतल्‍या आणि त्‍याच्‍यावर अंमलबजावणीही केली. पंतप्रधानांनी त्‍याला राष्‍ट्रीय मिशन बनवले. त्‍याच्‍या आधारावरच राष्‍ट्रीय महिला सशक्‍तीकरण मिशनची स्‍थापना करण्‍यात आली. महिलांच्‍या स्थितीचा व्‍यापकरित्‍या अभ्‍यास करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या प्रगतीसाठी न्‍या. रूमा पाल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एक समिती गठीत केली.
प्रश्‍न- तुमच्‍या विदेश दौ-यांबद्दल खूप काही लिहिण्‍यात आले. विदेशात भारताची छबी सुधारण्‍यासाठी या दौ-यांचा काही उपयोग झाला काय?
उत्तर- पहिल्‍यांदा हे माहित करून घेतले पाहिजे की, विदेश नीती सरकार बनवते. त्‍यानुसारच सगळे निर्णय घेतले जातात. या निर्णयांमध्‍ये विदेश दौरेदेखील येतात. राष्‍ट्रपतींचा विदेश दौरादेखील या निर्णयाअंतर्गतच येतो. ज्‍याप्रमाणे मी राष्‍ट्रपती या नात्‍याने दुस-या देशांमध्‍ये गेले. त्‍याप्रमाणेच माझ्या कार्यकाळात 100 पेक्षा अधिक देशातील राष्‍ट्राध्‍यक्ष आणि इतर उच्‍च पदस्‍थ अधिका-यांनी आपल्‍या देशाला भेटी दिल्‍या आहेत. मी तर अशा देशामंध्‍ये गेली आहे. जिथे गेल्‍या 50 वर्षांत आपल्‍या येथून कोणीही गेले नव्‍हते. आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालयामध्‍ये जस्टिस दलवीर भंडारी यांची झालेली नियुक्‍ती अशा विदेश दौ-यांचेच फलित आहे.
प्रश्‍न- लष्‍काराच्‍या सुप्रीम कमांडर पदाचा तुमचा अनुभव कसा होता? नुकत्‍याच घडलेल्‍या घटनाक्रमाबा‍बत काय म्‍हणाल?
उत्तर- मी सीमारेषेवर जाऊन जवानांना भेटले. जम्‍मू काश्‍मीरच्‍या सीमावर्ती भागातील चौक्‍यांबरोबरच अरूणाचल प्रदेशातील सीमारेषेवरील चौक्‍यांवरदेखील मी जाऊन आले. तिथे जाऊन मी जवानांचे मनोबल वाढवले. मी आधीपासूनच लष्‍करासाठी काम करत आले आहे. आमदार असताना 1962 साली चीन युद्धाच्‍यावेळी आम्‍ही महिला होमगार्डसची स्‍थापना केली. मी त्‍याची कमांडर होती. त्‍यासाठी खूप अवघड ट्रेनिंग आम्‍ही घेतले होते. त्‍याचा आज फायदा होत आहे. वायु दलाच्‍या प्रमुखांनी मला सुखोईमध्‍ये उड्डाण कराल का असे विचारले. जवानांचे मनोबल वाढवण्‍यासाठी त्‍यांनी मला असे करण्‍यासाठी सुचवले होते. त्‍यामुळे मी लगेच तयार झाले, आणि तयारी करू लागले. सुखोईमध्‍ये उड्डाण करणारी जगातील मी पहिलीच महिला राष्‍ट्रपती ठरले. लहान-मोठया गोष्‍टीतर सगळीकडे घडत असतात. परंतु, माझा विश्‍वास आहे की, भारतीय लष्‍कर हे जगातील सर्वात शिस्‍तबद्ध आणि समर्पित असे आहे.
प्रश्‍न- सर्वसामान्‍य जनता या पदाकडून आपल्‍या तक्रारींच्‍या निवारण्‍याची अपेक्षा ठेवते. काय म्‍हणाल याबद्दल?
उत्तर- प्रत्‍येक दिवशी चार-साडेचार हजार अर्ज आमच्‍याकडे येतात. पूर्वी याचे निवारण करण्‍यासाठी खूप वेळ लागायचा. यामध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी पोर्टल तयार करण्‍यात आले. त्‍यामुळे लोकांना सहजपणे आपली तक्रार नोंदवता येऊ लागली. लोकांकडून आलेली तक्रार त्‍याचदिवशी संबंधित विभागाकडे पाठवण्‍यात येते. त्‍यामुळे लोकांची चांगली सोय झाली आहे.
प्रश्‍न- निवृत्तीनंतर आपल्‍या काय योजना आहेत?
उत्तर- राष्‍ट्रपती भवनात मी एकटीच राहिलेली आहे. यादरम्‍यान कुटुंबातले लोक येत-जात असत. आता पूर्णपणे कुटुंबियांबरोबर राहणार आहे. समाज आणि देशाच्‍या कल्‍याणासाठी काम करण्‍याची लक्ष्‍य ठेवले आहे.
जूनमध्‍ये राष्‍ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी होण्‍याची शक्‍यता
राष्‍ट्रपती निवडणुकीसाठी संगमा बंडाच्‍या पावित्र्यात
डॉ. अब्‍दुल कलाम पुन्‍हा राष्‍ट्रपती होणार?