नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशात 'हिंदू दहशतवाद' असल्याचे केलेले वक्तव्य हे पुराव्यावर व वस्तुनिष्ठतेवर आधारितच आहे. शिंदे यांनी जबाबदारीने हे वक्तव्य केले असून, 'हिंदू दहशतवाद'चे आमच्या सुरक्षा यत्रंणाकडे भक्कम पुरावे आहेत, असे मत परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. तसेच दहशतवादाला कोणताही धर्म, जात व रंग नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खुर्शीद पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही माहिती याआधीही दिली आहे. यात नविन असे काहीही नाही. सर्व माहिती, पुरावे आमच्या सुरक्षा यत्रंणाकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान गृहसचिव आर. के. सिंग यांनीही आमच्याकडे 'आरएसएस'शी सबंधित किमान दहा हिंदूत्ववादी लोकांचे पुरावे आहेत, ज्यांनी समझोता एक्स्प्रेस, दर्गाह शरीफ व मालेगावमधील मशिदीत हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.