आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैद्राबाद- सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकवर तब्बल पाच कोटी फेसबुक अकाऊंट फेक अर्थात बनावट असल्याचे उघड झाले आहे. फेसबुकने 31 डिसेंबर 2012 ला एक अहवाल सादर केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
फेसबुकने दिलेल्या अहवालात दरमहा वापरात असलेल्या युझर अकाऊंटची माहिती दिली आहे. त्यानुसार 1.06 अब्ज युझर्सचे अकाऊंट नियमितपणे वापरले जाते. त्यात भारतात 7.1 कोटी युझर्सचाही समावेश आहे. अनेकजण आपल्या मुख्य अकाऊंटसोबत एक डुप्लीकेट अकाऊंटही बनवतात. अशा अकाऊंटचे प्रमाण 5 टक्के असल्याचा अंदाज आहे. बनावट खात्यांचे प्रमाण अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांमध्ये कमी आहे. त्यातुलने इंडोनेशिया किंवा तुर्कीसारख्या विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.
फेसबुक युझर्सच्या संख्येत 31 डिसेंबर 2011 च्या तुलनेत 31 डिसेंबर 2012 ला 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारत, ब्राझील तसेच इंडोनेशिया या देशांमध्ये फेसबुकचे युझर्स झपाट्याने वाढत असल्याचेही फेसबुकने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.