आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांसह 85 कोटींचे हेरोइन जप्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर । सीमा सुरक्षा दलाच्या 65 व्या बटालियनने मंगळवारी रात्री उशीरा भारत-पाकिस्तान सीमेवरून सुमारे 85 कोटी रुपयाचे हिरोइन आणि नऊ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. घुसखोरी करणा-या एका तस्कारालाही ठार मारण्यात आले.
भरोपाल पोस्टजवळील काटेरी कुंपणाजवळ पोलिस कॉन्स्टेबल गस्त करत असताना दुस-या बाजूने एके 47 बंदुकीतून गोळिबार करण्यास सुरुवात केली. या कारवाईत सीमा पार करण्याच्या प्रयत्नातील तस्कर ठार झाला. अन्य दोघे जण फरार झाले. तस्करापासून नऊ लाख 68 हजार रुपयांच्या बनावट नोटा, 17 किलो हिरोइन आणि पाकिस्तानचा मोबाइल जप्त करण्यात आला.