आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Jawan Take Traning Of Cammandos In Jharkhand

झारखंडमध्ये बनावट जवानाने घेतली दीड महिना कमांडो ट्रेनिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंडमधील एका व्यक्तीने दीड महिना स्पेशल टास्क फोर्स, ‘झारखंड जगुआर’चे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशिक्षण कालावधीत संबंधित व्यक्ती कमांडोसोबत टेंडर ग्राम येथील जेजे परिसरात राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस महासंचालक जी. एस. रथ यांनी चौकशीचे आदेश दिले. बनावट जवानाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अवस्थी आहे. कमांडो प्रशिक्षण केंद्राच्या एका अधिका-या नेच प्रशिक्षणासाठी त्याच्या नावाची शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे. गौरव अवस्थी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात प्रशिक्षण केंद्रात होता. पोलिसांना मात्र महिन्यानंतर याबाबतची माहिती मिळाली. नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी झारखंडमध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर झारखंड जगुआरची स्थापना केली आहे. बनावट व्यक्ती प्रशिक्षण केंद्रात घुसलाच कसा, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या परिसरात पोलिस कर्मचारी विना परवानगी व ओळखपत्राशिवाय दाखल होऊ शकतो. तेथे काम करणा-या मजुरांचेही संपूर्ण प्रोफाइल तयार केले जाते. कंत्राटदार व अभियंत्यांनाही ओळखपत्रावर प्रवेश दिला जातो.

कॅम्पसमध्ये शस्त्रांचे भांडार
जेजे परिसरात शस्त्र व दारूगोळा ठेवला जातो. या ठिकाणी जवानांना कमांडो प्रशिक्षण दिले जाते. या परिसरात जवानांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. कारवाईसाठी बाहेर गेलेल्या जवानांना परत आल्यानंतर त्यांना या ठिकाणी ठेवले जाते.