आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Family Of Afzal Guru Firm On Demand Of Getting Back Dead Body Of Afzal Guru

\'अफझलचा मृतदेह आमच्या ताब्यात द्या, सोपोरमध्‍ये करायचे आहे दफन\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्र सरकारने अफझल गुरुच्‍या कुटुंबियांना त्‍याच्‍या कबरीवर नमाज अदा करण्‍यास परवानगी दिली आहे. परंतु, अफझलच्‍या कुटुंबियांना हे मान्‍य नाही. अफझलचा मृतदेहच देण्‍याच्‍या मागणीवर त्‍याचे कुटुंबिय ठाम आहेत.

अफझल गुरुला फाशी दिल्‍यानंतर तिहार तुरुंगातच त्‍याचा मृतदेह दफन करण्‍यात आला. सरकारने त्‍याच्‍या कुटुंबियांना मृतदेह देण्‍यास नकार दिला. त्‍याला ज्‍या ठिकाणी दफन केले, तेथे जाऊन नमाज अदा करुन धार्मिक सोपस्‍कार पूर्ण करण्‍याची विनंती कुटुंबियांनी केली होती. ती गृह मंत्रालयाने मान्‍य केली. परंतु, आता कुटुंबिय त्‍याच्‍या मृतदेहाच्‍या मागणीवर अडले आहेत. त्‍याचा मृतदेह सोपविल्‍यास धार्मिक परंपरेनुसार अंत्‍यसंस्‍कार करु. आमची सरकारकडे कोणतीही मागणी नाही. आम्‍हाला आमच्‍या भावाचा मृतदेह मिळावा, असे अफझलचा चुलत भाऊ मोहम्‍मद यासिनने सांगितले.