आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारतामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने त्याचा परिणाम जागतिक धान्य उत्पादनावर होणार आहे. जागतिक उत्पादनात 7.8 टक्क्यांनी घट होणार असल्याचे भाकीत संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) हे वर्तवले आहे.
यंदाच्या हंगामातून जागतिक पातळीवर 732.3 दशलक्ष टन धान्य उत्पादन होणे अपेक्षित होते; परंतु त्यात 7.8 टक्क्यांनी घट होऊन ते 724.5 दशलक्ष टन इतके होईल, असे दिसून येते. भारतातील पावसाचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षी 713 दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
एफएओने पाहणीतून घेतलेल्या आढाव्यात हा मुद्दा मांडला आहे. उत्पादनातील घसरणीला भारतातील पाऊस कारणीभूत आहे. भारतात 22 टक्के कमी पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यामध्येच हा पाऊस पडणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. कंबोडिया, तैवान, कोरिया, नेपाळमध्येही धान्य उत्पादन यावर्षी घटणार आहे. त्याचा परिणाम खरीप पिकांवर होण्याची भीती आहे. पाऊस नसल्याने तांदूळ उत्पादनात घट होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.