आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Father Dazing Seeing Sun's Dead Body On Railway Track

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुळावरील मृतदेह मुलाचा निघाल्याने पिता बेशुद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- रुळावर पडलेला मृतदेह स्वत:च्या मुलाचाच असल्याचे पाहून रेल्वे कर्मचारी बेशुद्ध झाल्याची हृदयद्रावक घटना येथे घडली. गांधीनगरच्या वावोल स्थानकानजीक ही दुर्घटना घडली. रेल्वे रुळावर मृतदेह असल्याची माहिती स्टेशन मास्तरांना मंगळवारी रात्री 12.30 वाजता मिळाली.रेल्वे मास्तरांनी कर्मचारी कंडास्वामी यांना मृतदेह पाहण्यास व त्याची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले. त्यावेळी आपण येऊपर्यंत तेथे वाट पाहावी, असे पोलिसांनी कंडास्वामींना कळवले. यानंतर ते तीन तास मृतदेहाजवळच होते. आरपीएफ जवानांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे कपडे झटकले तर त्यातून मोबाइल निघाला. कंडास्वामी यांचा 25 वर्षांचा मुलगा विजय याचा तो मोबाइल होता. मुलाचा मृतदेह बघताच ते बेशुद्ध पडले. यानंतर आरपीएफ जवानांनी त्यांना धीर दिला.