आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रीमलायनर विमानात दोष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो/ नवी दिल्ली - अमेरिकी विमाननिर्मिती कंपनी बोइंगच्या ड्रीमलाइन विमानामध्ये तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे. यानंतर जपानमधील दोन प्रमुख एअरलाइन्सने ड्रीमलायनरची सर्व उड्डाणे रोखली आहेत. भारतात विमान उड्डाण नियामक डीसीजीएनेही विमानांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून चौकशीची घोषणा केली आहे. एअर इंडियाकडे सहा ड्रीमलायनर विमाने आहेत.

जपानमध्येऑ ल निप्पॉन एअरवेजचे एक ड्रीमलायनर विमान मंगळवारी आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. विमान उतरताना पाच लोकांना किरकोळ जखम झाली होती. यानंतरऑ ल निप्पॉन एअरवेजने बुधवारी सर्व 17 ड्रीमलायनर विमानाचे उड्डाण रोखले.
ड्रीमलायनर विमान खरेदी करणारीऑ ल निप्पॉन एअरवेज जगातील पहिली कंपनी आहे. जपान एअरलाइन्सनेही याच श्रेणीतील सात विमानांचे उड्डाण रोखले आहे. जपानच्या विमान कंपन्यांनी आणखी काही त्रुटी शोधल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल फायर, फ्यूअल लिकेज, ब्रोकन कॉकपिटचा समावेश आहे. बोइंगने मात्र, आपली विमाने संपूर्ण सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

एअर इंडियाचा निर्णय नाही
एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानांचे उड्डाण रोखले जाणार नाही, असे भारतीय हवाई वाहतूक विभागातील अधिका-यांनी सांगितले. विमान तपासणीबाबत अमेरिकेतील अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. एअर इंडियाने बोइंगला 27 ड्रीमलायनरचीऑ र्डर दिली आहे. त्यापैकी सहा मिळाली आहेत.

बॅटरीत बिघाड
ऑल निप्पॉन एअरवेजची यामागुचीहून हनिदा जाणा-या 692 विमानाच्या बॅटरीत बिघाड झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर कॉकपिटमधून धूर येऊ लागला. विमानात बिघाड झाल्याचे स्पष्ट होताच ते ताकामत्सूमध्ये उतरवण्यात आले.

एकूण ड्रीमलायनर
ऑल निप्पॉन एअरवेज (जपान) : 17, इथिअपियन एअरलाइन्स (इथिओपिया): 4, जपान एअरलाइन्स : 7, एअर इंडिया :6, युनायटेड एअरलाइन्स (चिली): 3, लोत पॉलिश एअरलाइन्स (पोलंड): 2 ,
एकूण : 50