आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर - रुक्साना कौसर. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे राहणारी एक सर्वसामान्य तरुणी. एका प्रसंगात तिने प्रचंड धाडस दाखवले आणि तरुणींसाठी आदर्श बनली. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी इंदूर येथे आलेल्या रुक्साना कौसरने तिची शौर्यगाथा सांगितली, तेव्हा ऐकणा-यांच्या अंगावर काटा आला.
27 सप्टेंबर 2009 ची सायंकाळ. संधिप्रकाश विरत चालला होता. आईवडील आणि भावासह रुक्साना घरात बसलेली होती. अचानक पाच दहशतवादी घरात घुसले आणि त्यांनी रुक्सानाच्या वृद्ध आईवडिलांना मारहाण सुरू केली. सुरुवातीला असे वाटले की, ते फक्त दहशत निर्माण करण्यासाठी असे करत असावेत; पण मारहाण थांबतच नव्हती. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच रुक्सानाने कोप-या त पडलेली कु-हाड उचलून दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. मनात थोडी भीती होती; पण दहशतवाद्यांबद्दल चीड दाटून आली.
रुक्सानाच्या या अनपेक्षित हल्ल्याने दहशतवादी गांगरून गेले. एक दहशतवादी एके-47 उचलत असल्याचे दिसताच रुक्सानाने त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला.
तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. तो जिवंत राहिला तर आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही, हे उमजताच रुक्सानाच्या मनात पुन्हा भीती दाटून आली; पण भीती बाजूला सारून धैर्य एकवटत रुक्सानाने दहशतवाद्याचीच एके-47 हिसकावून घेतली आणि त्याच्यावर नेम धरून ट्रिगर दाबले. धाड धाड असा प्रचंड आवाज करत गोळ्या सुटल्या. दोन दहशतवादी ठार झाले.
त्या वेळी 19 वर्षांची असलेल्या रुक्सानाने हे धाडस दाखवले खरे; पण त्या दिवसापासून प्रत्येक क्षण दहशतीच्या सावटाखाली जातो आहे. कारण लष्कर-ए-तोयबाने रुक्सानावर पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. दहशतवाद्यांचे धमक्यांचे फोन दररोज येत असतात; पण हिंमत जराही कमी झाली नसल्याचे रुक्साना सांगते.
स्वत: रुक्साना, तिचा पती आणि भाऊ आज पोलिस दलात कार्यरत असल्याचा रुक्सानाला अभिमान आहे. हाच वसा पुढे कायम ठेवत तिच्या दोन्ही मुलींनाही पोलिस बनवण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.