आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fill Fir Againest Sushilkumar Shinde & P. Chidambaram

तेलंगणाप्रश्नी गृहमंत्री शिंदे व चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल करा- कोर्टाचा आदेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- स्वतंत्र तेलगंणा राज्याबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ, असे आश्वासन देणा-या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी गृहमंत्री व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश हैदराबादमधील एमएम सेकंड कोर्टाने आज दिला आहे.

तेलंगणा राज्य स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डिसेंबरमध्ये एक महिन्याची मुदत निश्चित केली होती. मात्र याबाबतचा निर्णय घेण्यास आणखी कालावधी लागणार असल्याचे त्यांनी रविवारी स्पष्ट केले होते. दरम्यान, तेलंगणा राष्ट्रसमितीचे आंदोलन सुरुच असून, त्याला वेगळे वळण लागण्याची शक्यता होती. तेलंगणा राष्ट्रसमितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने केली. आमदार के. ताराकरमा राव यांना मोर्चासाठी जात असताना पोलिसांनी अटक केली होती.

आंध्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद यांनीही स्पष्ट केले की, तेलंगणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंध्रातील इतर नेत्यांशी सविस्तर चर्चेची गरज आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही कालावधीची गरज आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यामुळे तेलंगणाविषयीचा निर्णय लांबणीवर पडला असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर सोमवारी लगेच हैदराबादमधील एमएम या सेकंड कोर्टाने शिंदे आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी फसवणूक केली असल्याचे मत व्यक्त करीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असा आदेश दिला आहे. गृहमंत्रीपदी असताना पी. चिदंबरम यांनीही तेलंगणा स्वतंत्र करण्याबाबत असेच आश्वासन दिले होते.

पंतप्रधानांनी निवेदन द्यावे: राजनाथ सिंह- भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आज नागपुरात असून, त्यांनीही तेलंगणा स्वतंत्र राज्याबाबत मत व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने याबाबतची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असून, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी याबाबत तत्काळ निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी सिंग यांनी केली.