आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिंप नेते प्रविण तोगडियांनी ओवेसींना म्हटले \'कुत्ता\'; तक्रार दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- विश्व हिंदू परिषदचे नेते प्रवीण तोगड़िया यांच्यावर गेल्या वर्षी निर्मळ येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका यू-ट्यूबवर असलेल्या व्हिडिओमध्ये विहिंप नेते प्रवीण तोगड़िया मजलिस-ए-एत्तेहादुलचे आमदार अकबरुद्दीन ओवेसींना 'कुत्ता' असे संबोधल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यात ओवेसींचे नाव घेतलेले नाही.

ओवेसींनी डिसेंबर महिन्यात हैदराबादजवळील निर्मळ येथे असेच प्रक्षोभक भाषण दिले होते. त्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर ओवेसींना प्रत्त्युत्तर देताना तोगड़िया यांनी तसेच वादग्रस्त विधान केले होते. तोगडिया यांनी हे भाषण निर्मळपासून 80 किलोमीटर दूर असलेल्या भोकर येथे जानेवारीत दिले आहे.

व्हिडिओत तोगडिया म्हणत आहेत की, मुस्लिम व्होट बॅंकेच्या आधारावर देशात लूट चालवली आहे. याचमुळे हैदराबादमधील 'एक कुत्ता' स्वत:ला वाघ समजू लागला आहे. एकाने म्हटले, पोलिस हटवा, मी म्हटले 20 वर्षात जेव्हा-जेव्हा पोलिस हटवली गेली आहे त्या काळातील देशाचा इतिहास पाहा. तुला माहित नसेल तर आरशात इतिहास दाखवेन. तोगडिया यांनी मागील 20-25 वर्षातील दंगलींचा हवाला देत सांगितले की, आम्हाला आव्हान देण्याची चूक करु नका.

तोगडिया सध्या अलाहाबादमधील कुंभमेळ्याच्या तयारीत व्यस्त आहेत. येथे भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी समस्त साधू-संतांची एक बैठकीद्वारे हा निर्णय घेतला जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी रोजी अलाहाबादमधील कुंभमेळ्याला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.