आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वच रेल्वेत हवे फायर अलार्म;संसदीय समितीची सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वेतील सततच्या आगीच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत संसदीय समितीने रेल्वे विभागाला उपाय शोधण्याची शिफारस केली आहे. सर्व रेल्वे गाड्यांमध्ये आग अलार्म प्रणाली तत्काळ बसवण्याची सूचना रेल्वेवरील संसदेच्या स्थायी समितीने केली आहे.
द्रमुक खासदार टी. आर. बालू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रेल्वेमध्ये स्वयंंचलित आग अलार्म प्रणाली बसवण्याची शिफारस केली आहे. तामिळनाडू एक्स्प्रेसच्या डब्याला नुकत्याच लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे समितीने बैठक घेतली. या वेळी समितीकडून अनेक शिफारशी करण्यात आल्या. तामिळनाडू एक्स्प्रेसच्या एका डब्याला 30 जुलै रोजी लागलेल्या आगीत 32 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीसारख्या दुर्घटनांचा सामना करण्यासाठी विदेशात वापरली जाणारी उपाययोजना येथे राबवली जावी, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जावी, यासंदर्भात देश-विदेशातील तज्ज्ञांचा सल्ला विचारात घ्यावा, रेल्वेतील आगीच्या संभाव्य धोक्याबाबत जागरूक राहण्यासाठी दरवर्षी ‘फायर ऑडिट’ केले जावे, रेल्वेच्या विविध विभागातील विविध तज्ज्ञांचा त्यात समावेश करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व डब्यांमध्ये पाणी फवारे आणि आग प्रतिबंधक साहित्य पुरवण्यास समितीने सांगितले आहे. डब्यात आग प्रतिबंधक साहित्य वापरण्यावर भर देत समितीने इलेक्ट्रिक फ्यूजमध्ये अ‍ॅल्युमिनियमऐवजी तांब्याच्या तारेचा वापर करावा, आग लागल्यानंतर आणीबाणीच्या स्थितीत प्रवाशांना मदत पुरवता यावी यासाठी रेल्वे पोलिस दलातील जवानांना प्रशिक्षण देण्यात यावे, रेल्वेत स्वयंचलित आग प्रतिबंधित साहित्य बसवण्याबाबत रेल्वे विभागाने तत्काळ विचार करावा. विविध डब्यांमध्ये आग प्रतिबंधक साहित्य बसवल्यामुळे संभाव्य आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकेल, असे समितीने म्हटले आहे.