आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदी पट्ट्यातील पहिली मातृदूध बँक उदरयपूरमध्ये

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उदयपूर - हिंदी भाषिक राज्यातील पहिली मातृदूध बँक उदयपूर वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहे. राजस्थानातील बालमृत्यू दरातील वाईट स्थिती पाहता हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जाणार आहे. सद्य:स्थितीत गरजवंत नवजात बालकांना प्रक्रिया केलेले दूध किंवा पावडर देऊन आयसीयूमध्ये ठेवले जाते. देशात मुंबई, सुरत, पुणे आणि कोलकात्यात अशा पद्धतीच्या दूध बँक आहेत. उदयपूर वैद्यकीय महाविद्यालयातील राजकीय महिला रुग्णालय परिसरात सुरू करण्यात येणा-या या दूध बँकेत दूध दान करणा-या मातांचे आरोग्य तपासणी करण्यात येईल. विशेषत: एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, सी च्या संक्रमणाची तपासणी करण्यात येईल. दुधाच्या तपासणीनंतर वजा 20 डिग्री तापमानावर तीन महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवले जाईल.
सुरत येथील यशोदा ह्युमन मिल्क बँकेशी संबंधित बालरोगतज्ज्ञ डॉ. केतन भदरवा यांच्या म्हणण्यानुसार अवेळी मृत्युमुखी पडणा-या शंभर नवजात बालकांपैकी 16 बालकांना आईच्या दुधामुळे वाचवले जाऊ शकते.
जास्त फायदा कुणाला?
अकाली (प्री-मॅच्युअर) बाळंतपणातील नवजात बालकांसाठी.
नवजात बालकांच्या आईचा मृत्यू झाल्यास किंवा बालक गंभीर आजारी असल्यास.
जुळे किंवा तिळे झाल्यास.
अनाथाश्रमात आलेल्या नवजात बालकांसाठी.
एका पिढीने अव्हेरले; तीन पिढ्यांनी स्वीकारले