आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fish Shortage In Goa As Trawler Strike Continues

डिझेल दरवाढीविरोधात गोव्‍यात मासेमारी बंद, माशांचे भाव कडाडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- गोव्‍यामध्‍ये समुद्री खाद्यपदार्थ खासकरुन मासे आणि झिंगे अतिशय महागले आहेत. याचे कारण म्‍हणजे, मासेमारीसाठी समुद्रात जाणा-या ट्रॉलर्स मालकांनी डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामुळे तीन दिवसांपासून गोव्यात मासेमारी बंद आहे. त्‍यामुळे माशांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने डिझेलची दरवाढ केली आहे. परंतु, याचा थेट फटका मासेमारीला बसला आहे. मासेमारीसाठी समुद्रात ट्रॉलर्सने जातात. डिझेल दरवाढीमुळे खर्च वाढला आहे. मत्‍स्य व्‍यवसायात तसाही नफा कमी आहे. त्‍यामुळे मासेमारीत नुकसान होत असल्‍याचे अखिल गोवा मासेमार संघटनेने म्‍हटले आहे. संघटनेचे अध्‍यक्ष जॉन मेडीस यांनी यासंदर्भात सागितले की, डिझेल दरवाढीचा निषेध म्‍हणून दोन दिवस मासोळी बाजार बंद ठेवण्‍यात येणार आहे. सरकारने डिझेलची दरवाढ रद्द करावी, अशी मागणीही करण्‍यात आली आहे. खाण आणि पर्यटन उद्योगानंतर गोव्यात मासेमारी हा तिसरा सर्वात मोठा उद्योग आहे. गोव्यातील ट्रॉलर्समालक उद्या, दिल्लीत कृषीमंत्री शरद पवार यांना भेटणार असल्याचं मेंडीस म्हणाले.

ट्रॉलर्सच्या संपामुळे गोव्यात माशांचे भाव कडाडले असून झिंगा 500 रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. इतरवेळी झिगा 300 रुपये किलो दराने विकला जातो. मत्स्यप्रेमी गोवेकर जनतेच्या रोजच्या जेवणातील मासेच गायब झाल्यामुळे तोंडची चव गेली आहे.