आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद पित्‍याने ओठ चावलेल्‍या दुर्दैवी चिमुरडीचा अखेर मृत्‍यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- मद्यधुंद पित्‍याच्‍या निर्दयीपणाची शिकार झालेल्या पाच महिन्‍याच्‍या चिमुरडीची आज (बुधवारी) रूग्‍णालयात प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपूर्वी या चिमुरडीच्या पित्याने मद्यधुंद अवस्थे‍त तिचे ओठ आणि नाकाचा कडकडून चावा घेतला होता. त्यामुळे चिमुरडीच्‍या ओठाला गंभीर जखम झाली होती. त्यानंतर तिच्‍यावरील ओठांवर प्‍लास्टिक सर्जरीही करण्‍यात आली होती. परंतु अचानक या मुलीची तब्‍येत खालावली आणि डॉक्‍टर तिला वाचवण्‍यात अयशस्वी ठरले.

दरम्यान, आरोपी भादर सिंग याने 25 जानेवारी रात्री दारूच्‍या नशेत आपल्‍या पाच महिन्‍याच्‍या चिमुरडीच्या ओठाचा कडकून चावा घेतला होता. एवढे करून हा नराधम पिता थांबला नाही. त्याने त्याच्या तीन वर्षाच्‍या मुलीलाही चावा घेऊन तिला जखमी केले होते. गंभीर अवस्‍थेत दोघींना रूग्‍णालयात दाखल केले होते. तिथे चार दिवसांपूर्वीच त्‍या चिमुरडीच्‍या ओठावर प्‍लास्टिक सर्जरी झाली होती. बुधवारी सकाळी अचानक तिची तब्‍येत बिघडल्‍यानंतर तिला व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले होते. परंतु त्यांचा काही उपयोग झाला नाही.