आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Five Thousand Crore Fund Create For Election Demanded By Asochem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकांसाठी 5000 कोटींचा निधी उभारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवारांकडून प्रचंड प्रमाणात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याबद्दल असोचेम या वाणिज्य संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक काळातील आर्थिक गैरव्यवहार
टाळण्यासाठी व या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी देशपातळीवर 5,000 कोटी रुपयांचा सार्वजनिक निधी उभारला जावा, अशी सूचनाही संघटनेने केली आहे.


असोचेमच्या वतीने सरकारला केलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, या वर्षी अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यांसाठी स्वतंत्र निवडणूक कोष उभारण्यात यावेत. तर सध्या निवडणूक खर्चासाठी दरवर्षी 1000 कोटींच्या निधी उभारून पाच वर्षांत ही रक्कम 5 हजार कोटींवर नेण्यात यावी. पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी यातून निधी उपलब्ध करून देण्यात यावी.


असोचेमचे राष्‍ट्रीय परिषदेचे अध्यक्ष वेद जैन, कायदे परिषदेचे डी. एस. रावत यांनी एका कार्यक्रमांत ‘फंडिंग ऑफ पार्लमेंटरी असेंब्ली इलेक्शन’ हा अहवाल सादर केला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सार्वजनिक स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्याच्या अध्ययनाबाबत असोचेमने म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 40 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे; परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी पट अधिक खर्च होतो. या जास्तीच्या पैशांचा स्रोत सांगितला जात नाही. सत्तेवर असलेले नेते, मंत्री विविध मार्गांनी पैसा जमा करतात व तो पैसा निवडणूक काळात प्रचारासाठी तसेच मते विकत घेण्यासाठी करतात. त्याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या या खर्चाचे लेखा परीक्षण करावे, असे समितीने म्हटले आहे.