आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Five Times Money More Came Out Of Atm In Raipur Due To Mistake By Bank

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएममधुन पाचपट जास्‍त पैसे मिळतात तेव्‍हा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- झारखंडची राजधानी रायपूरमधील अँक्सिस बँकेतील एटीएममध्ये सोमवारी अजब प्रकार घडला. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना शंभर रुपयांऐवजी चक्क पाचशेच्या नोटा मिळू लागल्या. असा प्रकार नक्की केव्हापासून सुरू झाला, याची माहिती मिळाली नाही. दुपारपर्यंत ही गोष्ट बर्‍याच जणांना कळाली. शंभर रुपयांऐवजी 500 ची नोट मिळू लागल्याने त्याच एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी उसळली. अचानक अशा प्रकारे गर्दी झालेली पाहून बँक अधिकार्‍यांचे डोळे उघडले आणि ताबडतोब एटीएम मशीन लॉक करण्यात आले.

पाचपट पैसे मिळवण्यासाठी झुंबड : महादेव नावाच्या एका व्यक्तीने पहिल्यांदा हजार रुपये काढण्यासाठी एटीएमचा वापर केल्याचे समोर आले आहे. मशीनमधून त्याला 2600 रुपये मिळाले. मागितलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे पाहून तो विचारात पडला. आता एवढय़ा रकमेचे करायचे काय, या विचारात तो होता. तेवढय़ात त्याने बँक व्यवहार झाल्याची पावती पाहिली. 2600 रुपये निघाले तरी पावतीवर हजार रुपये काढल्याची नोंद आली. ते पाहून महादेवने पुन्हा पैसे काढले. तेव्हाही असेच झाले. महादेवनंतर अनेकांनी अशाच प्रकारे पाचपट जास्त पैसे काढून घेतले. रायपूरमधील पंडरी भागातील या एटीएमची बातमी अँक्सिस बँक व्यवस्थापनाला कळली. त्यानंतर तत्काळ तंत्रज्ञांची टीम पाठवून एटीएम लॉक करण्यात आले. ज्या लोकांना जास्त पैसे मिळाले त्यांचा शोध घेऊन पैसे वसूल करण्याची कारवाई बँकेने सुरू केली आहे.

आतापर्यंत एटीएममध्ये पैसे अडकण्याचे किंवा जास्त रक्कम गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र शंभर रुपयांऐवजी पाचशे रुपयांची नोट निघण्याचा पहिलाच प्रकार समोर आला आहे. तंत्रज्ञांच्या मते, शंभर रुपयांच्या ट्रेमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा टाकल्याने असे घडू शकते. तर कधी कधी तांत्रिक बिघाडामुळेही असे घडू शकते.