आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजाचा मृत्‍यू की हत्‍या? सिगारेट, शॉपिंग बिलाने वाढले रहस्‍य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगढः अनुराधा बाली उर्फ फिजा हिच्‍या मृत्‍यूचे गुढ वाढतच आहे. पोलिसांनी तिच्‍या आत्‍महत्‍येशी शक्‍यता फेटाळली आहे. पोलिसांनी तिच्‍या घराची तपासणी केली असून व्हिडीओदेखील बनविला आहे. घरातून सुसाईड नोट मिळालेले नाही. त्‍यामुळे तिची हत्‍या करण्‍यात आली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे.
सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, घरातून दारुची बाटली, सिगारेटचे पाकिट, एक ग्‍लास, खाण्‍याचे साहित्‍य इत्‍यादी वस्‍तू आढळल्‍या. फिजा दारु प्‍यायची. परंतु, तिला सिगारेटचे व्‍यसन नव्‍हते. त्‍यामुळे घटनास्‍थळावरुन मिळालेले सिगारेटचे पाकिट कोणाचे, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एवढेच नव्‍हे, तर तिच्‍या गळ्याला ओढणी घट्टपणे आवळलेली आढळली. तिचा मृत्‍यू झोपेच्‍या गोळ्यांचे अतिसेवन केल्‍यामुळे झाला, तर ओढणी एवढ्या घटटपणे कशी आवळली होती? तसेच तिच्‍या मृतदेहाजवळ शॉपिंगचे सामान आढळले आहे. तिने 1 ऑगस्‍ट रोजी काही वस्‍तू आणि नवे कपडे खरेदी केले होते. तिच्‍यासोबत एक मुलगा आला होता, अशी माहिती दुकानदाराने दिली. हा मुलगा कोण होता, याचा शोध घेण्‍यात येत आहे.
VIDEO : खुलेआम 'मजा' करायचा चांद, तर फिजा लाजायची...
PHOTOS : फिजा उर्फ अनुराधा बाली हिचा गुढ मृत्‍यू
PHOTOS :\'फिजा\'ची आत्महत्या की मर्डर; घरात आढळल्या दारुच्या बाटल्या