आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममधील पूराने घेतला 125 जणांचा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - आसाममधील पूरपरिस्थितीने रौद्ररूप धारण केले असून आत्तापर्यंत 125 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
अतिवृष्टीचा फटका राज़्यातील 24 लाख नागरिकांना बसला असून 4,540 गावे पाण्याखाली गेली आसल्याची माहिती सुत्रांनी दिली. सतत होणार्‍या पावसाने 27 जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
सतत होणार्‍या पावसामुळॆ नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीलगतच्या गावांना धोक्याची सुचना देण्यात आली आहे. पूराच्या पाण्याचा फटका काझिरंगा अभयारण्यातील प्राण्यांना देखील बसला असून अत्तापर्यंत 595 प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. पूराच्या पाण्याचा फटका रेल्वेसेवेवरही पडला आहे.