आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी हिंदूसाठी भारताची कवाडे खुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निर्धारित नियमांप्रमाणे अर्ज केल्यास पाकिस्तानातील हिंदूंनाही भारतात मुक्काम करण्यासाठी दीर्घ काळाचा व्हिसा जारी करण्यात येईल अशी घोषणा आज केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली. पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनंतर शेकडो हिंदू कुटुंबीय भारताच्या आर्शयासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर भारताने पीडित हिंदू कुटुंबीयांसाठी आपली कवाडे खुली केली आहेत.
सध्यातरी कुणीही दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी अर्ज केलेले नाहीत असे सांगून दीर्घ काळ वास्तव्य करायचे असल्यास त्यासाठी वेगळ्या निकष आहेत.त्या निर्धारित निकषांनुसार अर्ज केल्यास त्यांना दिर्घ मुदतीचा व्हिसा जारी करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी दिली. पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात हिंदू मुलींचे अपहरण,धर्मांतर आणि व्यापार्‍यांचे खंडणीसाठी अपहरण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. 7 ऑगस्ट रोजी सिंध प्रांतातील मनीषा कुमारी या किशोरवयीन मुलीच्या अपहरणाची घटना घडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये उमटले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात सुमारे 250 हिंदू भारतात आले आहेत.या सर्व हिंदू भाविकांना महिनाभराचा व्हिसा देण्यात आला आहे. देवदर्शनाच्या नावाखाली भारतात आलेल्या या लोकांपैकी अनेकांना मायदेशी परत जाण्याची इच्छा नाही. मात्र भारतसरकारकडे आर्शय मागणार नाही आणि 30 दिवसांनंतर मायदेशी परतणार असल्याचे हमीपत्र पाकिस्तान सरकारने या हिंदू नागरिकांकडून लिहून घेतले आहे.