आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forest Officer Collect Illeagal 50 Thousand In Madhy Pradesh

मध्य प्रदेशातील वन अधिका-याकडे 50 कोटींची माया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन/भोपाळ - मध्य प्रदेशात बेहिशेबी मालमत्तेची आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. लोकायुक्त पोलिसांनी बुधवारी उज्जैनमध्ये मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) डॉ. वसंतकुमार सिंहच्या सरकारी निवासस्थानी तसेच भोपाळमधील घरी छापा मारून रोख रक्कम, दागिने व कोट्यवधींच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त केली. छापासत्र सुरू असताना सिंह यांनी दोन सुटकेसमध्ये नोटा व कागदपत्रे भरून मागच्या दाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकातील अधिका-या ने गेटवरून उडी मारून त्याला पकडले.

लोकायुक्त एस.पी. अरुण मिश्रा यांनी सांगितले की डॉ. सिंह उज्जैन येथे आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या निवासस्थानी 6.68 लाख रुपये रोख सापडले. या शिवाय मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील विविध शहरांत त्याची शेकडो एकर जमीन, मालमत्ता, हॉटेल व कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असल्याची कागदपत्रे आढळली आहेत. सिंह यांनी गौतम इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी स्थापन केली आहे. यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत.

25 वर्षे नोकरी 75 लाख वेतन
डॉ. सिंह 1987 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असून छिंदवाडा, सिहोर, होशंगाबादनंतर त्यांची उज्जैन येथे नेमणूक झाली होती. 2000 नंतर त्यांना 75 हजार रुपये मासिक वेतन मिळाले. त्यांच्या 25 वर्षाच्या नोकरीत त्यांना जवळपास 75 लाख वेतन मिळाले. सर्व खर्च वजा जाता त्यांच्याकडे 40 लाखांची संपत्ती आढळली असती तर कारवाईची वेळ आली नसती. मंगळवारी भोपाळ येथे वीज कारकुनाच्या घरी टाकलेल्या छाप्यात 30 कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता आढळून आली होती.