आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Prachandas Son Elove With Lady Love From Mount Everest

माजी पंतप्रधानांच्या मुलाने कोट्यवधी रुपयांसह पळवली मुलगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटना - नेपाळचे माजी पंतप्रधान आणि माओवादी नेते पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांचे पुत्र प्रकाश दहल सध्या नेपाळमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत.
ही चर्चा कोणत्याही राजकीय घडामोडीमुळे नसून, प्रकाश यांनी त्यांच्या दोन लग्नानंतर आता एका मुलीला पळवून नेल्याची चर्चा आहे. दहल सध्या पाटण्यात वास्तव्याला आहे, अशीही माहिती पुढे आली आहे. प्रकाशने १९९६ ते २००२ पर्यंत पाटण्यात राहूनच आपले शिक्षण घेतले आहे.
नुकतेच नऊ जणांच्या टीमसह प्रकाशने माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्याच्या या साहसी सफरीसाठी नेपाळ सरकारने दोन कोटी रुपये घोषित केले होते. मात्र, सरकारच्या या घोषणेवर सर्वस्तरातून टीकेची झोड उठू लागल्यामुळे प्रकाशने निधी नाकारला आणि सरकारनेही घोषणा मागे घेतली होती.
माऊंट एव्हरेस्ट सर करुन आल्यानंतर प्रकाश त्याची सहकारी बीना थापासह फरार झाला. बीना माओवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची नेता आहे. याआधी प्रकाशचे दोन विवाह झाले असून, तो एका मुलाचा पिता आहे.
प्रकाशचे पहिले लग्न प्रचंड यांचे मित्र आणि माओवादी नेता बहादूर बोगती यांच्या मुलीशी झाले होते. १६ महिन्यांतच या दोघांनी काडीमोड घेतला. त्यानंतर प्रकाशचे लग्न श्रीजना पाठक हिच्याशी झाले या जोडप्याला एक मुलगा देखील झाला.