आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत उपचार करणारे पथक घरोघर जाणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - गंभीर आजारांवरील उपचार दिवसेंदिवस महागडे होत चालल्याने आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील बालकांसाठी मोफत उपचारांची योजना केंद्र सरकारने आखली आहे. पाच फेब्रुवारी रोजी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील जौहार या आदिवासी गावामधून या योजनेस आरंभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या नव्या योजनेत 6 वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये ब्लॉकस्तरावर डॉक्टरांच्या फिरत्या पथकांची स्थापना करण्यात येत आहे. ही पथके लोकांच्या घरी व शाळेत जाऊन मुलांची तपासणी करणार आहेत. मुलांमध्ये कसलीही कमतरता किंवा आजार आढळल्यास उपचार उपलब्ध करून दिले जातील. या योजनेचा लाभ सुमारे 20 कोटी मुलांना होणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-या ने सांगितले की, देशात आजारांचे ओझे सतत वाढत चालले आहे. बहुतांश जिल्हा रुग्णालयांमध्ये आणि महानगरांमधील शासकीय रुग्णालयांमध्ये गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्चही बराच असतो. त्यामुळेच रा ष्‍ट्री य ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत (एनआरएचएम) बालकांच्या आरोग्याची मोफत तपासणी व उपचाराची ही योजना सुरू केली जात असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
लहान वयातच गंभीर आजारांवर योग्य उपचार केले तर ते बरे होण्याची शक्यता वाढते आणि उपचारांवर खर्चही कमी येतो, असा या योजनेचा उद्देश असल्याची माहिती या अधिका-या ने दिली.