आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्‍वे भाडेवाढीची पुन्‍हा एकदा टांगती तलवार, इंधन अधिभाराचा प्रस्‍ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- महागाईच्‍या विळख्‍यात अडकलेल्‍या सर्वसामान्‍य जनतेला आणखी एक दणका देण्‍याचा विचार सरकार करीत आहे हा दणका असेल दुस-या रेल्‍वेभाडीचा. डिझेल दरवाढीनंतर रेल्‍वेने प्रवासभाड्यावर इंधन अधिभार लावण्‍याचा विचार सुरु केला आहे. यास दुसरा पर्याय म्‍हणजे मालवाहतुकीचे दर वाढविण्‍याचा विचार आहे. त्‍यामुळे प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्षपणे जनतेला याची झळ सोसावीच लागणार आहे.

नव्‍या वर्षाच्‍या पहिल्‍या आठवड्यातच रेल्‍वे भाडेवाढ करण्‍यात आली होती. अनेक वर्षांनी ही दरवाढ असल्‍यामुळे निर्णय पचवलाही होता. परंतु, आता रेल्‍वे दुसरा धक्‍का देणार आहे. रेल्‍वे अर्थसंकल्‍प 26 फेब्रुवारीला मांडण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी रेल्‍वे मंत्रालाची तयारी अंतिम टप्‍प्‍यात आहे. राजधानी, दुरंतो आणि शताब्‍दी एक्‍स्‍प्रेसच्‍या भाड्यांमध्‍ये वाढ करण्‍यात येणार आहे. परंतु, आता इंधन अधिभार लावून सर्वसामान्‍यांवर दुसरी भाडेवाढ लादण्‍याचा विचार सुरु आहे.

रेल्‍वे सध्‍या आर्थिक टंचाईत आहे. प्रवासी वाहतुकीतून रेल्‍वेला सध्‍या 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. भाडेवाढ करुन वार्षिक 6 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्‍पन्‍न वाढविण्‍याचा रेल्‍वेचा प्रयत्‍न होता. परंतु, डिझेल दरवाढीमुळे 3300 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा रेल्‍वेवर पडणार आहे. त्‍यामुळे आता इंधन अधिभार लावण्‍याचा प्रस्‍ताव आहे.