आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्र्यांच्या निधीमध्ये 24 टक्के कपात होणार:अर्थ मंत्रालयाचा प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्यामुळे मंत्र्यांच्या निधीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 2013-14 च्या अर्थसंकल्पात या निधीत 24 टक्क्यांनी कपात करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अर्थ मंत्रालयाने हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. काही मंत्र्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी नाराजीचा सूर आळवला आहे. अर्थव्यवस्थेची वाटचाल वाईट परिस्थितीतून होत आहे. त्यामुळे अर्थमंत्रालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे. ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पत्र लिहून आपल्या मंत्रालयाच्या निधीमध्ये कपात करू नये , अशी विनंती केली होती, असे वृत्त मीडियातून चर्चेला होते. परंतु रमेश यांनी ते फेटाळून लावले. रमेश यांच्या खात्याला 2012-13 साठी 85 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. सामाजिक क्षेत्राशी संबंधित विभागांना अगोदरच फार निधी नाही. त्यात त्यांच्याही निधीमध्ये कपात झाली तर हाती काहीच रहाणार नाही. त्यामुळे विकास करणे शक्य होणार नाही, असे आदिवासी मंत्री व्ही. किशोर चंद्र देव यांनी सांगितले.