आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fund Shortage To The Defence Sector ; Gdp's Total Provision 1.79 Percent

संरक्षण क्षेत्रासाठी अपुरा निधी ; राष्‍ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत 1.79 तरतूद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख तसेच संरक्षणतज्ज्ञांनी या वर्षी अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी अपुरी तरतूद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षेच्या संदर्भातील देशाची सद्य:स्थिती लक्षात घेता करण्यात आलेली ही तरतूद अपुरी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वर्षी संरक्षण क्षेत्रासाठी सकल राष्‍ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत 1.79 टक्के तरतूद करण्यात आली आहे. माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा चीन व पाकिस्तानसारखे शेजारी देश त्यांच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी जीडीपीच्या तीन टक्के तरतूद करतात, तेव्हा भारतानेही संरक्षण तरतुदीमध्ये वाढ करायला हवी. भारताची संरक्षण तरतूद जीडीपीच्या 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

मलिक यांनी सांगितले की, चीनने संरक्षणासाठी जवळपास 3.5 टक्के तरतूद केली आहे. पाकिस्तानची संरक्षण तरतूद 4.5 टक्के इतकी आहे. अशा स्थितीत आम्हीही अशी मागणी करतो की संरक्षणासाठी भारताने किमान जीडीपीच्या 3 टक्के निधी द्यायला हवा. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, पूर्वीपासूनच देशात संरक्षणासाठी कमी निधी दिला जात आला असून वाढवण्याऐवजी तो कमी केला जात आहे. 2013-14 साठी संरक्षण मंत्रालयाला 2.03 लाख कोटी रुपये निधी प्रस्तावित ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही रक्कम 1.79 लाख कोटी इतकी होती. जीडीपीशी तुलना करता या वर्षी अर्थसंकल्पात 1.90 कोटींऐवजी केवळ 1.79 टक्के निधीच प्राप्त झाला आहे.

संरक्षण तयारीवर परिणाम शक्य
मलिक यांच्या म्हणण्यानुसार, संरक्षण दलांसाठी एकूण निधी देत असताना त्यात संरक्षण साहित्य खरेदीसाठी होणारा विलंब व त्यामुळे वाढणारी किंमत तसेच महागाई यासारख्या मुद्द्यांचा विचार केला गेलेला नाही. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, वरील तरतूद करताना महागाई ध्यानात घेतली गेली नाही. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत उघड झालेल्य त्रुटीही लक्षात घेतल्या गेल्या नाहीत. अपु-या निधीचा लष्कराच्या संरक्षण तयारीवर परिणाम होईल का, असे विचारले असता ते म्हणाले की, याचे परिणाम लगेच दिसून येणार नाहीत. परंतु त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतो.

सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल आर. के. साहनी म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी केली गेलेली तरतूद पूर्णपणे अपुरी आहे. लष्कराच्या तयारीसाठी आणखी निधी दिला जाण्याची गरज आहे. साहनी यांनीही अपु-या तरतुदीचे दूरगामी होतील, अशी भीती व्यक्त केली. संरक्षणतज्ज्ञ देव आर. मोहंती यांच्यानुसार भारताच्या संरक्षण निधीत अपुरी तरतूद निराश करणारी आहे. राष्‍ट्रीय सकल उत्पन्नानुसार संरक्षणासाठीची तरतूद वाढवली जाणे गरजेचे होते.

हवाई दलाचा राजस्थानात सर्वात मोठा युद्धसराव
जोधपूर ।भारतीय वायुदलाच्या स्थापनेला 80 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रथमच आपल्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवणार आहे. वायुदलाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा युद्धसराव ‘लाइव्ह वायर’ 16 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत जोधपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यात हवाई दलाच्या पाचही विभागांतील 33 स्क्वाड्रनची लढाऊ विमाने त्यांची कौशल्ये सादर करतील. असा युद्धसराव आयोजित करणारे भारतीय हवाई दल आशिया खंडातील पहिले हवाई दल ठरणार आहे.