आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुखियांवर अंत्‍यसंस्‍कार; अंत्‍ययात्रेदरम्‍यान सी.पी. ठाकूर यांच्‍यावर हल्‍ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणाः रणवीर सेनेचे संस्‍थापक ब्रह्मेश्‍वर मुखिया यांच्‍यावर आज कडक सुरक्षा बंदोबस्‍तामध्‍ये येथे अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. चोख सुरक्षा असूनही अंत्‍ययात्रेत सहभागी झालेल्‍या समर्थकांनी भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सी. पी. ठाकूर यांच्‍यावर हल्‍ला केला. ठाकूर यांच्‍या दोन वाहनांवर दगडफेक करण्‍यात आली. त्‍यात आमदार अनिल शर्मा जखमी झाले. संतप्‍त समर्थकांनी ठाकूर यांना गाडीबाहेर ओढून जबर मारहाण केली. अगदी थोडक्‍यात ते बचावले. पाटणा ग्रामिणचे पोलिस अ‍धीक्षकदेखील समर्थकांच्‍या रोषातून बचावले.
आरा येथून आज सकाळी 9 वाजता अंत्‍ययात्रा काढण्‍यात आली. त्‍यात हजारोंच्‍या संख्‍येने समर्थक सहभागी झाले होते. त्‍यामुळे मार्गात सर्वत्र पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता. पाटण्‍यामध्‍ये गंगा नदीवर बांसघाट येथे अंत्‍यसंस्‍कार करण्‍यता आले. काल पहाटे ब्रह्मेश्‍वर मुखिया यांची आरा हत्‍या करण्‍यात आली होती. अज्ञात हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍यावर बेछुट गोळीबार करुन हत्‍या केली. घटनेनंतर संपूर्ण भोजपूर जिल्‍ह्यात तणाव निर्माण झाला होता.
फक्त २७७ हत्या अन् २२ नरसंहार, जाणून घ्या रणवीर सेनेच्या प्रमुखाबाबत...
ब्रह्मेश्‍वर सिंह यांच्‍यावर झाडल्‍या 40 गोळ्या, भोजपूरमध्‍ये संचारबंदी